Mardol  Dainik Gomantak
गोवा

Mardol: म्हार्दोळच्या मळेकरांना दिलासा; ग्रामसभेत सरपंचांनी दिलंय आश्वासन, 'मुख्य रस्त्यावरच्या...'

Mardol: म्हार्दोळ येथील सुगंधित जाई पूर्ण राज्यभर प्रसिद्ध असून येथील जायांच्या फुलांना गोमंतकातील देवळांमध्ये प्राधान्य दिले जाते.

Ganeshprasad Gogate

Mardol: दोन दिवसांपूर्वी म्हार्दोळ येथील जाईच्या मळ्यांना अज्ञाताकडून आगी लावण्याचा प्रकार झाला होता. या घटनेत जाईचे पूर्ण मळे जळून खाक झाले होते. मात्र या मळे मालकांना सरपंच हर्षा गावडे यांनी ग्रामसभेत आश्वासन देत दिलासा दिलाय.

येत्या बुधवार- गुरुवार पर्यंत जाईच्या मळ्याखाली मुख्य रस्त्यावर असलेल्या बेकायदेशीर गॅरेज व अन्य आस्थापनावर कारवाई करण्यात येईल असे सरपंचांनी सांगितले आहे.

म्हार्दोळ येथील सुगंधित जाई पूर्ण राज्यभर प्रसिद्ध असून येथील जायांच्या फुलांना गोमंतकातील देवळांमध्ये प्राधान्य दिले जाते.

पण सध्या म्हार्दोळच्या या जाई नामशेष होण्याच्या मार्गावर असून जायांची जागा बिल्डर लॉबीच्या घशात घालण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचा आरोप मळेकरांनी केला आहे.

म्हार्दोळ येथील सुमारे साठ कुटुंबे या जायांच्या फुलांवर उदरनिर्वाह करतात. फुलकार समाजाचा जाई व इतर फुलांवरच चरितार्थ चालतो.

विशेष म्हणजे म्हार्दोळच्या ‘जायांचे पोड’ राजधानी पणजीत तसेच म्हापसा व इतर शहरातही विकले जातात, पण आता ही जायांची फुलेच नष्ट करण्याचा प्रयत्न चालला आहे.

जायांच्या मळ्यांना आग लावण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने हे मळेच नष्ट होऊ लागले आहेत. केवळ आगच नव्हे, तर रासायनिक द्रव्यपदार्थही मळ्यातील झाडांना घातला जात असल्याने ही झाडेच नाहीशी होण्याच्या मार्गावर आहेत.

याशिवाय रस्त्याच्या कडेला एका परप्रांतीयाकडून सिमेंट ब्लॉक्स तयार केले जातात, या कामातून उडणाऱ्या सिमेंटमुळे मळ्यांना हानी पोहिचत असल्याचे मळेकरांचे म्हणणे आहे.

आगीच्या घटना सातत्याने होत असल्याने आम्ही आमचे कुटुंब चालवायचे कसे, असा सवाल म्हार्दोळच्या फुलकार समाजाने केला आहे.

येथील मळेकरांनी काबाडकष्ट करून झाडे वाढवली, पण आता बिल्डर लॉबीच्या घशात ही जमीन घालण्यासाठी असे प्रकार केले जात आहेत, असा आरोपही मळेवाल्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "...अन् डोळ्यासमोर अंधारीच आली!" मेलबर्नमध्ये मोहम्मद रिझवानची फजिती; नाजूक जागी चेंडू लागताच मैदानात उडाली खळबळ

Mangal Gochar 2026: नशिबाची साथ अन् पैशांची बरसात! मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; गुंतवणूकीतून मिळणार मोठा परतावा

गोवा वीज विभागाचा अलर्ट! उत्तर आणि दक्षिण गोव्यातील 'या' भागांत वीज पुरवठा खंडित; दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय

IND vs NZ: 'किंग' कोहलीची ऐतिहासिक 'विराट' ओव्हरटेकिंग; मैदानात पाऊल ठेवताच मोडला सौरभ गांगुलीचा मोठा रेकॉर्ड

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

SCROLL FOR NEXT