.Venzy Viegas meets Hon’ble Minister for forest Shri Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: वृक्षतोड शुल्काबाबत आमदार व्हिएगस यांनी वनमंत्र्यांची भेट घेत सादर केलंय 'हे' निवेदन

Vishwajit Rane: सरकारने घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करावा- वेंझी व्हिएगस

Ganeshprasad Gogate

Vishwajit Rane: बाणावलीतील स्थानिक सुतारांनी शुक्रवारी आमदार वेंझी व्हिएगस यांची भेट घेऊन त्यांना वनविभागाने काढलेल्या अधिसूचनेत वृक्षतोडीवर लावलेले शुल्क कमी करण्याबाबत निवेदन सादर केले.

त्यांनी सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि, 'वनविभागाने वृक्षतोडीवर लावलेले शुल्क हे भरमसाठ असून त्यामुळे खेड्यापाड्यातील गरीब सुतार काम करणाऱ्या आणि त्याच कामावर आपली उपजीविका करणाऱ्या कामगारांवर अन्याय होतोय.

त्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करावा तसेच वृकद्ध लागवड केलेल्या झाडांवर जिओटॅगचा अवलंब करावा.'

या मागणीसह त्यांनी स्थानिक सुतार कामगारांनी वेंझी व्हिएगस यांची भेट घेऊन आपले प्रश्न मांडल्यावर व्हिएगस यांनी तात्काळ वनमंत्र्यांना या बाबतचे निवेदन दिले. तसेच याप्रश्नी त्यांनी लक्ष घालून सुतार कामगारांच्या समस्या सोडवण्याची विनंती केलीय.

झाडे तोडण्यासाठीच्या विषयासंदर्भात प्रती झाड 1 हजार रुपये शुल्क करण्याची अधिसूचना वन खात्याने काढली आहे.

अधिसूचनेतील शुल्क रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्याजवळ प्रस्ताव मांडला जाईल, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. त्यामळे आता सरकार यावर कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: दुचाकीस्वारावर झाड कोसळले

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT