Vegetable Price Hike: शनिवार-रविवार सुट्ट्या असल्याने लोकांचा आठवडा भाजीपाला तसरच किराणा खरेदीवर भर असतो. त्यांच्यासाठी हि महत्वाची बातमी असून गोव्यातील भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झालेली दिसून येतेय.
बदलत्या वातावरणाचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम होत असून सध्या भाज्यांनी शंभरीकडे वाटचाल केली असून काही भाज्यांनी तर शंभरी ओलांडल्याचे चित्र गोव्यातील भाजी बाजारांमध्ये दिसतेय.
मागील आठवडी बाजारात कांदा, बटाटा तसेच टोमॅटोचे भाव स्थिरावले असले तरी बयाच भाज्यांनी दराची शंभरी गाठली आहे. बाजारात कैऱ्या दाखल झाल्या असून, सामान्यांना न परवडणाऱ्या दरात त्या विकल्या जात आहेत.
मागील महिनाभरापासून अपवाद वगळता बहुतेक भाज्या महागच आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून भाज्यांची खरेदी कमी प्रमाणावर होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. महागलेल्या भाज्यांमुळे ग्राहकांचा प्रतिसाद कमी असल्याचे दिसून आले.
वालपापडी100 रुपये प्रतिकिलो झाली आहे. चिटकीचा दर वाढून तो 100 रुपये प्रतिकिलो झाला आहे. हिरवी मिरचीही १०० रुपये प्रतिकिलो होती.
दोडगी 80 वरून 120 रुपये किलोवर गेली आहे. डब्बू मिरची 120 रुपये, भेडी 130 रूपये, कारली 120 रुपये तर ठांगी 100 रुपये प्रतिकिलो अशा दरात विक्री होत आहे.
वाल 120 रुपये प्रतिकिलो होती. गाजर 80 रुपये, बिट 60 रुपये, काकडी 60 रुपयेप्रमाणे विकली जात होती. मटार 80 रुपये किलो होते.
शेवग्याच्या शेंगा 20 रुपयांना 4 होत्या. लिंबू आकारानुसार 2 रुपयांपासून प्रतिनग या दरात विक्री होत आहे. शेपू, मेथी, लाल भाजी 10 ते 20 रुपये प्रति जुड़ी होती.
कोथिंबीर 20 रुपये जुडी आहे. गावठी मुळा, लाल भाजी 20 रुपये जुड़ी आहे. गड्ढे 20 रुपयांना 4 ते 5 नग दिले जात होते, फ्लॉवर आकारानुसार 30 रुपयांपासून तर कोबी 20 रुपयांपासून विक्री होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.