Goa Theft Case: पणजी पोलिसांची कार्यतत्परता; चोरीच्या 24 तासांतच कारसह चोरट्याला रंगेहाथ अटक

Goa Theft Case: पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजवरून कारचा मागोवा घेणे सोपे झाले
Theft Case
Theft CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Theft Case: गोव्यात वाढत्या शहरीकरणासोबतच गुन्हेगारीचे सत्रही वाढतच चालले आहे. पणजी नजीक ताळगावातील मोकळ्या जागेत पार्क केलेली कारची चोरी करण्याची घटना घडली आहे.

महत्वाची बातमी म्हणजे या पळालेल्या चोरट्याला 24 तासांच्या आत कारसह रंगेहाथ पकडण्यात पणजी पोलिसांनी यश आले आहे.

पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे. पोलिसांनी पकडलेल्या या चोराचे नाव राज राजू सुहेदरे असे असून तो रत्नागिरीतील रहिवासी असल्याचे समजतेय.

Theft Case
Calangute Night Club: कळंगुट किनारी भागातील नाईट क्लबवर विक्रीकर विभागाची छापेमारी; GST रेकॉर्ड तपासणी सुरु

कार मालकाने 11 जानेवारी रोजी रात्रौच्या सुमारास ताळगाव येथील कम्युनिटी हॉलजवळील मोकळ्या जागेत GA-08N-2386 या क्रमांकाची हिरव्या रंगाची ‘डॅटसन रेडी गो’ कार पार्क केली होती.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 जानेवारी रोजी कार मालकाने दुपारी येऊन घटनास्थळी पाहिले असता कार गायब झालेली त्याचा लक्षात आले.

कार मालकाने लागलीच पणजी पोलिसांत चोरीची तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजवरून कारचा मागोवा घेणे सोपे झाले आणि आणि त्यांनी 24 तासांच्या आत संशयिताला कारसह रंगेहाथ पकडले.

पणजीचे पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या नेतृत्त्वाखाली हेडकॉन्स्टेबल विनीत कुर्टीकर, नितीन गावकर, सायेश उस्कईकर आणि आदित्य म्हार्दोळकर या पथकाने ही कामगिरी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com