Unseasonal Rain In Goa Dainik Gomantak
गोवा

Unseasonal Rain In Goa: राजधानीत 'अवकाळी' बरसला; आंबा, काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता

Unseasonal Rain In Goa: रात्रौ 8 च्या सुमारास राजधानी पणजीसह लगतच्या परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Ganeshprasad Gogate

Unseasonal Rain In Goa: गेल्या 2 दिवसांपासून राज्यासह लगतच्या सिंधुदुर्गात पावसाळी वातावरण निर्माण झाले असून बुधवारी रात्री मडगावात पावसाच्या सारी कोसळल्या. गुरुवारी राज्यात काहीसे ढगाळ हवामान अनुभवायला मिळाले.

रात्रौ 8 च्या सुमारास राजधानी पणजीसह लगतच्या परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अरबी समुद्रात पावसाला पोषक असे वातावरण तयार झाल्याने पुढील दोन तीन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सध्या हिवाळा सुरु असून अवकाळी बरसल्याने शेतकरी राजाने चिंता व्यक्त केली आहे. कारण हिवाळ्यात आंबा, काजू सारख्या फळांच्या झाडांना मोहोर येण्यास सुरवात होते. तसेच याच काळात बागायतदार मोहोरावर औषध फवारणी करीत असतात.

अचानक आलेल्या पावसाने मात्र बागायतदारांची चिंता वाढवली असून यंदा आंबा-काजूचे पीक कितपत येईल याबाबत बागायतदार संभ्रमात आहेत.

तसेच भाजीपाल्यावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारपेठेत भाज्यांचे दर काहीसे चढेच असल्याने गृहिणीच्या आर्थिक बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

तसेच सध्या वाढती थंडी, त्यातच कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या आणि आता हा बरसलेला अवकाळी पाऊस यामुळे सर्दी- तापाचे रुग्ण देखील वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT