Suyash Prabhudesai Dainik Gomantak
गोवा

Ranji Trophy Cricket: सुयश प्रभुदेसाईचे नाबाद शतक

किशोर पेटकर

Ranji Trophy Cricket Tournament: सुयश प्रभुदेसाई याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील वैयक्तिक मोठ्या धावसंख्येचा दुष्काळ संपुष्टात आणताना शुक्रवारी चंडीगडविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याच्या नाबाद १२४ धावांच्या बळावर गोव्याने एलिट क गट सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ३ बाद २६७ धावा केल्या.

पर्वरी येथे शुक्रवारी चार दिवसीय सामन्याला सुरवात झाली. गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. २६ वर्षीय सुयशने २८व्या सामन्यातील तिसऱ्या रणजी करंडक शतकाची नोंद केली.

सलामीला खेळताना त्याने २४० धावांच्या खेळीत १२ चौकार व एक षटकार मारला. सुयशने संघात पुनरागमन केलेल्या ईशान गडेकर (४५ धावा, ८० चेंडू, ६ चौकार, १ षटकार) याच्यासमवेत ७९ धावांची सलामी दिली, तर त्रिपुराविरुद्ध अगोदरच्या लढतीत दुसऱ्या डावात नाबाद दीडशतक केलेल्या के. व्ही. सिद्धार्थ (७७ धावा, १५९ चेंडू, ९ चौकार) याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी केली.

त्यामुळे नव्या लाल मातीच्या खेळपट्टीवर गोव्याच्या फलंदाजांचे वर्चस्व दिसले. चहापानानंतर दिवसातील अखेरच्या १९ षटकांतील खेळात गोव्याने दोन गडी गमावल्यामुळे चंडीगडला दिवसअखेर थोडाफार दिलासा मिळाला.

पर्वरीत नोंदविले दुसरे शतक

गतमोसमात पर्वरी येथे राजस्थानविरुद्ध २१२ धावा आणि नंतर कर्नाटकविरुद्ध अनुक्रमे ८७ व नाबाद ६१ धावा केलेल्या सुयश प्रभुदेसाईला मागील पाच रणजी सामन्यांतील नऊ डावात सूर गवसला नव्हता. २९ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.

चार दिवसीय सामन्यांतील खराब फॉर्म झटकताना सुयशची बॅट शुक्रवारी कडाडली. चहापानानंतर मध्यमगती राज अंगद बावा याला नेत्रदीपक षटकार खेचत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या या फलंदाजाने कारकिर्दीतील तिसरे, तर पर्वरी मैदानावरील दुसरे वैयक्तिक शतक पूर्ण केले. सुयश या डावात सुरवातीपासून आत्मविश्वासाने खेळला, त्यामुळे त्याची खेळी निर्दोष ठरली.

दमदार सुरवात

सुयश व ईशान यांनी गोव्याला दमदार सुरवात करून दिली. तुलनेत ईशान जास्त आक्रमक होता. उपहारापूर्वी चंडीगडचा फिरकी गोलंदाज अर्पित पन्नू याला षटकार खेचल्यानंतर त्याच षटकात ईशानचे अंदाज चुकला व अर्धशतकाला पाच धावा हव्या असताना तो त्रिफळाचीत बाद झाला.

सिद्धार्थने खुलून फलंदाजी केल्यामुळे सुयशलाही बळ लाभले. सिद्धार्थ आणखी एका शतकाच्या दिशेने कूच करत असताना राज अंगद बावाच्या गोलंदाजीवर थर्डमॅन क्षेत्रात संदीप शर्माने त्याचा झेल पकडला. त्यामुळे जम बसलेली जोडी फुटली.

स्नेहल कवठणकर (६) याला जगजित सिंगच्या गोलंदाजीवर कव्हर्समध्ये अर्स्लान खान याने टिपल्यामुळे गोव्याला दिवसाचा खेळ संपत असताना मोठा धक्का बसला. दिवसअखेर राहुल त्रिपाठी १२ धावा करून सुयशला साथ देत होता.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ९० षटकांत ३ बाद २६७ (ईशान गडेकर ४५, सुयश प्रभुदेसाई नाबाद १२४, के. व्ही. सिद्धार्थ ७७, स्नेहल कवठणकर ६, राहुल त्रिपाठी नाबाद १२, जगजित सिंग १-४८, राज अंगद बावा १-३६, अर्पित पन्नू १-६८).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT