Ranji Trophy Cricket Tournament Dainik Gomantak
गोवा

Ranji Trophy Cricket Tournament: चिवट सिद्धार्थचे दीडशतक, इतरांची फक्त हजेरी

Ranji Trophy Cricket Tournament: अखेरपर्यंत खिंड लढविली, पण त्रिपुराचा गोव्यावर विजय

किशोर पेटकर

Ranji Trophy Cricket Tournament: के. व्ही. सिद्धार्थने चिवट फलंदाजीचे सर्वांगसुंदर प्रदर्शन घडवताना धैर्याने किल्ला लढविला, पण इतरांनी त्याला समर्थ दिली नाही, खेळपट्टीवर फक्त हजेरीच लावली.

बंगळूरमध्ये जन्मलेल्या जिगरबाज फलंदाजाने अखेरपर्यंत खिंड लढविली, मात्र दुसऱ्या टोकाकडून तोलामोलाची साथ न मिळाल्यामुळे त्याचे नाबाद दीडशतक व्यर्थ ठरले.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात त्रिपुराने गोव्यावर सोमवारी सामन्याच्या शेवटच्या चौथ्या दिवशी अखेरच्या सत्रात २३७ धावांनी विजय मिळविला.

आगरतळा येथील महाराज बीर बिक्रम स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीस एकदम वाईट नव्हती हे सिद्धार्थने सिद्ध करून दाखविले, पण गोव्याचे इतर फलंदाज बोध घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. परिणामी 501 धावांच्या आव्हानासमोर गोव्याचा दुसरा 263 धावांत आटोपला.

इतर फलंदाजांनी थोडी कळ सोसली असती, तर नक्कीच गोव्याला पराभव टाळता आला असता. मोसमातील पहिल्याच लढतीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे आता बाकी लढतीपूर्वीच गोव्याचा संघ दबावाखाली आला आहे.

गोव्याचे गोलंदाज त्रिपुराच्या फलंदाजांसमोर साफ निष्प्रभ ठरले. दोन्ही डावात मिळून त्यांना त्रिपुराचे 15 फलंदाजच बाद करता आले, तर यजमान संघाने चार दिवसांत गोव्याला दोन वेळा सर्वबाद केले. त्रिपुराला विजयामुळे सहा गुण मिळाले. गोव्याचा पुढील सामना शुक्रवारपासून (ता. १२) पर्वरी येथे चंडीगडविरुद्ध खेळला जाईल.

सर्वोत्तम खेळीचा नजराणा

कर्नाटककडून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या 31 वर्षीय सिद्धार्थने रविवार दिवसअखेरच्या 16धावांवरून सोमवारी पुढे खेळायला सुरूवात करताना चौथ्या दिवसअखेर नाबाद 151 धावा केल्या.

त्याने २५८ चेंडूंतील खेळीत २३ चौकार मारले. २१व्या प्रथम श्रेणी सामन्यातील त्याचे हे एकंदरीत चौथे, तर त्याने गोव्यासाठी पहिल्याच लढतीत शतक नोंदविले. सिद्धार्थने सकाळच्या सत्रात नाईट वॉचमन लक्षय गर्ग (२७) याच्यासमेवत चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली.

लक्षयला अभिजित सरकारने बाद केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या राहुल त्रिपाठीने पुन्हा एकदा निराशा केली. त्यानंतर सिद्धार्थने कर्णधार दर्शन मिसाळ (२३) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करताना त्रिपुराच्या तंबूत अस्वस्थता निर्माण केली.

दर्शनला सुदीप चटर्जी याने बाद केल्यानंतर गोव्याच्या बाकी फलंदाजांनी समोरील सिद्धार्थला साथ दिली नाही, त्यामुळे अप्रतिम दीडशतकी खेळी गोव्याचा पराभव टाळू शकली नाही.

संक्षिप्त धावफलक

त्रिपुरा, पहिला डाव ः ४८४

गोवा, पहिला डाव ः १३५

त्रिपुरा, दुसरा डाव ः ५ बाद १५१ घोषित

गोवा, दुसरा डाव (३ बाद ४८ वरून) ः

९७.२ षटकांत सर्वबाद २६३ (के. व्ही. सिद्धार्थ नाबाद १५१, लक्षय गर्ग २७, राहुल त्रिपाठी ३, दर्शन मिसाळ २३, दीपराज गावकर १५, अर्जुन तेंडुलकर १०, मोहित रेडकर ४, विजेश प्रभुदेसाई ४, मणिशंकर मुरासिंग ३-६४, राणा दत्ता ३-४५, अभिजित सरकार २-४२, बिक्रमजित देबनाथ १-१६, सुदीप चटर्जी १-२२).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT