Sanjivani Suger Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory: 8 जानेवारीपासून पणजीत आंदोलन छेडण्याचा ऊस उत्पादकांचा निर्धार; सरकारला दिलाय 'हा' इशारा

Sanjivani Suger Factory: संजीवनी साखर कारखान्याच्या मागण्यांसाठी तीव्र लढा

Ganeshprasad Gogate

Sanjivani Suger Factory: संजीवनी साखर कारखान्यासमोर आंदोलन छेडणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आता पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

संजीवनी साखर कारखान्यासाठी ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांनी इनेथॉल प्लांटची मागणी केली होती. मात्र सरकार यावर गंभीरपणे विचार करत नाही.

हे कळल्यावर आणि सरकारला स्पष्ट इशारा देऊनही मागण्या मान्य न झाल्यामुळे 02 जानेवारीपासून गोमंतक ऊस उत्पादक संघटनेच्या सदस्यांनी अखेर आंदोलनाला सुरुवात केली. हे आंदोलन आज म्हणजेच (5 जानेवारीला) तिसऱ्या दिवशीही सुरूच होते.

त्यामुळेच आता 8 जानेवारीपासून शेतकऱ्यांनी हे आंदोलन अधिकच तीव्र होण्याच्या दृष्टीने राजधानी पणजीत आझाद मैदानावर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे.

या आंदोलनात तब्बल 250 ऊस उत्पादक शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आमच्या मागण्या मान्य करा, कारखाना पूर्ववत चालू करा या मागण्यांसोबत ''जो पर्यन्त मुख्यमंत्री आमची दाखल घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार'', असल्याचा एल्गार यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केलाय.

याच बाबतीत काही दिवसांपूर्वी ऊस उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी समिती सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारकडून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत आंदोलन सुरु केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT