Mapusa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Mapusa Drugs Case: मोठी कारवाई! म्हापशात 35 किलोंच्या अंमली पदार्थांवर छापा; 55 लाखांचा मुद्देमाल जप्त

Ganeshprasad Gogate

Mapusa Drugs Case: म्हापसा येथे पोलिसांनी अंमली पदार्थांवर छापा टाकल्याची माहिती प्राप्त झालीय. या कारवाईत 30 किलो गांजा आणि 5 किलो चरस एवढ्या मोठ्याप्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या या मालाची बाजार किमंत 55 लाख रुपये असून याप्रकरणी मनीष महाडेश्वर याला म्हापसा पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

गोव्यात सध्या पर्यटनाचा हंगाम सुरु झाला असून देश-विदेशीचे पर्यटक गोव्यात दाखल होत आहेत. याच कालावधीत गोव्यात अमली पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणावर होतहोत असल्याचे विविध घटनांमधून समोर आले आहे.

गोवा पोलीस नेहमीच अशा घटनांना आळा घालण्यासाठी सतर्कपणे गस्त घालत असलेले पाहायला मिळत आहेत.

दरम्यानच्या काळात गोव्यात आयोजित केल्या जाणाऱ्या सनबर्न फेस्टिवलच्या माध्यमातूनही अमली पदार्थांची राजरोसपणे विक्री केली जात असल्याचा आरोप गोवा काँग्रेसने याआधी केला होता. त्यामुळे सनबर्न फेस्टिवलवर समाजातील सर्वच स्तरातून ताशेरे ओढले गेले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT