Babush Monserrate: 2027 कशाला बाबूश यांनी आताच राजीनामा द्यावा, पणजीतील महिलांचे खुले आव्हान

बाबूश मोन्सेरात यांनी 2027 ची वाट न पाहता आताच राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे
Babush Monserrate
Babush MonserrateDainik Gomantak

Babush Monserrate: बाबूश मोन्सेरात यांनी 2027 ची वाट न पाहता आताच राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे खुले आव्हान आज पणजीतील महिला वगनि दिले.

बाबूश यांनी पणजीचे 25 वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. मनोहर पर्रीकर यांचा अपमान केल्यानंतर पणजीच्या घराघरात हा विषय चर्चिला जात आहे. पर्रीकर यांना मानणारा मोठा वर्ग भाजपच्या परिघाबाहेरही आहे.

उत्पल यांनी मोन्सेरात यांच्यावर व्यक्तिगत स्वरुपाचे आरोप केले नसतानाही या वादात बाबूश यांच्याकडून स्व. पर्रीकरांना ओढणे अनेकांना आवडलेले नाही. भाजपचे स्थानिक नेतृत्व या विषयावर मूग गिळून गप्प बसले असतानाही अनेकजण स्वतंत्रपणे समाज माध्यमावर व्यक्त होऊ लागले आहेत.

माजी नगरसेविका डॉ. शीतल नाईक, रेखा कांदे आणि माजी महापौर वैदेही नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोन्सेरात यांच्या पणजीतील लोकप्रियतेचा पंचनामा केला. त्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे खुले आव्हान दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com