CK Nayudu Trophy Dainik Gomantak
गोवा

Col. C.K. Nayudu Trophy: गोव्याच्या युवक संघाची धुलाई करत 'आंध्र'ची 404 धावांची कमाई

Col. C.K. Nayudu Trophy: सामन्याला आंध्र प्रदेशमधील कडापा येथील वायएस राजा रेड्डी स्टेडियमवर रविवारपासून सुरवात झाली.

किशोर पेटकर

Col. C.K. Nayudu Trophy: कर्नल सी. के. नायडू करंडक 23 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात आंध्रने गोव्याच्या गोलंदाजांनी रविवारी यथेच्छ धुलाई केली. आक्रमक फलंदाजी करताना त्यांनी चार दिवसीय सामन्याच्या पहिल्याच दिवशी 2 बाद 404 धावांचा डोंगर रचला.

सामन्याला आंध्र प्रदेशमधील कडापा येथील वायएस राजा रेड्डी स्टेडियमवर रविवारपासून सुरवात झाली. यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि सुरवातीपासूनच गोव्याच्या गोलंदाजांवर हल्ला चढविला.

के. रेवंत रेड्डी व वामशी कृष्ण यांनी 51 षटकांतच 256 धावांची सलामी दिली. वैयक्तिक 139 धावांवर वामशी बाद झाला. त्याने 141 चेंडूंतील झंझावाती खेळीत 10 चौकार व 8 षटकार मारले.

गोव्याचा लेगस्पिनर मनीष काकोडे याच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक शिवेंद्र भुजबळ याने वामशी याला यष्टिचीत बाद केले. नंतर कर्णधार वामसी कृष्ण जास्त काळ टिकला नाही.

मनीषच्या गोलंदाजीवर आंध्रच्या कर्णधाराने अझान थोटा याच्याकडे झेल दिला. मात्र नंतर के. रेवंत रेड्डी व एम. हेमंत रेड्डी यांनी गोव्याच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले.

दिवसअखेर रेवंत रेड्डी १६४ धावांवर खेळत होता. त्याने २८७ चेंडूंतील खेळीत २१ चौकार मारले. हेमंतनेही आक्रमक फलंदाजी केली. तो ९२ धावांवर नाबाद आहे.

त्याने ९७ चेंडूंतील खेळीत १२ चौकार व २ षटकार मारले. रेवंत व हेमंत जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १४० धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. गोव्याने दिवसभरात तब्बल आठ गोलंदाज वापरले.

संक्षिप्त धावफलक

आंध्र, पहिला डाव ः ९० षटकांत २ बाद ४०४ (के. रेवंत रेड्डी नाबाद १६४, वामशी कृष्ण १३९, वामसी कृष्ण ५, एम. हेमंत रेड्डी नाबाद ९२, शुभम तारी १५-०-६४-०, लखमेश पावणे १७-३-४९-०, मनीष काकोडे २०-१-१२०-२, दीप कसवणकर १५-२-७२-०, अभिनव तेजराणा ५-०-१८-०, योगेश कवठणकर १२-०-५६-०, राहुल मेहता ५-०-२३-०, आयुष वेर्लेकर १-०-१-०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Economy: पैसाच पैसा! Per Capita Income मध्ये गोव्याने पटकावला दुसरा क्रमांक; मग पाहिलं कोण?

Pooja Naik: Pooja Naik: पूजा नाईकच्या अडचणीत वाढ; म्हार्दोळ पोलिसांनी नोंदवला गुन्हा

Goa Live Updates: बेकायदेशीर घरांचे वीज व पाणी 'कनेक्शन कट'!

Dudhsagar Tourism: 'दूधसागर'ला पर्यटकांचा गोंधळ! तोबा गर्दीमुळे जीप पडल्या अपुऱ्या; संख्या वाढवण्याची मागणी

Leopard In Goa: सत्तरीत बिबट्याचा थरार! घराच्या अंगणात वाढला संचार; ग्रामस्थांची कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT