Bicholim Fire Case Dainik Gomantak
गोवा

Bicholim Fire Case: डिचोलीत फ्लॅटला आग, लाखोंची हानी; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

Bicholim Fire Case: फ्लॅटमधील गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Fire Case: डिचोलीतील आयडीसी परिसरात एका फ्लॅटला आग लागलो. शनिवारी मध्यरात्री लागलेल्या या आगीत लाखो रुपयांचे किमती साहित्य जळून खाक झाले. तर फाँटमध्ये अडकलेल्या अपूर्ण गौडा यांनी प्रसंगावधान राखून वेळीच बाहेर भाव घेतल्याने त्या बचावल्या.

आग लागली त्यावेळी फ्लॅटमधील गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

येथील मुस्लिमवाड्याजवळील "हरूण आशियाना" या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये काल रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास आगीची ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही दुर्घटना पडली.

त्यावेळी अन्नपूर्णा या एकट्याच या फ्लॅटमध्ये होत्या. उपलब्ध माहितीनुसार नेहमीप्रमाणे अन्नपूर्णा गौडा ही महिला काल रात्री आपल्या फ्लॅटमध्ये झोपी गेली होती.

मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आगीची ही घटना तीच्या निदर्शनास आली. त्यावेळी फ्लॅटमध्ये आग भडकली होती.

कशीबशी तीने बाहेर येऊन शेजाऱ्यांना जागे केले. शेजारच्यांनी धावपळ करून करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग नियंत्रणाबाहेर गेली होती.

मौल्यवान साहित्य बेचिराख:-

डिचोली अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. अग्रिशमन दलाच्या जवानांनी बंबासहित घटनास्थळी धाव घेतली आणि बऱ्याच प्रयत्तानंतर आग नियंत्रणात आणण्यात अग्रिशमन दलाच्या जवानांना या आले.

तोपर्यंत टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आदी किंमती साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. किचनमधील गॅस सिलिंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत पाच लाखांहून अधिक रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे.

नशीब बलवत्तर म्हणून मी वाचले- अन्नपूर्णा गौडा

रात्री मी गाढ झोपेत होते. मध्यरात्री अचानक जाग आली तेव्हा आगीच्या ज्वाला मडकल्या होत्या. मी बेडरूनमध्ये अडकले होते. बेडरुममधून बाहेर येणे अशक्य बनले होते. देवाचा धावा आणि धाडस करून आकांताने नी बाहेर धाव घेतली त्यामुळे सुखरूप बचावले, नशीब बलवत्तर आणि परमेश्वराच्या कृपेमुळे मृत्यूच्या दाढेतून मी वाचले - अन्नपूर्णा गौडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: पुढच्या पिढीसाठी गोवा जिवंत ठेवणे गरजेचे; सुरेश प्रभूंचे प्रतिपादन

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

SCROLL FOR NEXT