Calangute Fire Incident Dainik Gomantak
गोवा

Goa News: कळंगुटमध्ये आगीत दोन झोपड्या जळून खाक; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Latest News Updates: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी.

गोमंतक ऑनलाईन टीम

मोठ्या संख्येने रहिवाशांनी "म्हजे घर" उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले

मुरगाव मतदारसंघातील मोठ्या संख्येने रहिवाशांनी "म्हजे घर" उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले आणि मोरगाव मतदारसंघाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चतुर्थीची भेट असल्याचे म्हटले.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चिकण मातीच्या मुर्त्या महत्त्वाच्या

दाभाले वाडा पार्से येथील मनोज कलंगुटकर व कुटुंबीय शेकडो चिकण मातीच्याच गणेशमूर्त्या करतात,पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चिकण मातीच्या मुर्त्या महत्त्वाच्या असल्याचे मत व्यक्त करतात.

वन-म्हावळींगे-कुडचिरे पंचायतीची ग्रामसभा; शंभरहून अधिक ग्रामस्थ उपस्थित

वन-म्हावळींगे-कुडचिरे पंचायतीची ग्रामसभा. घरादारांच्या सर्वेक्षणाचा विषय ऐरणीवर. शंभरहून अधिक ग्रामस्थ उपस्थित. सुरवातीलाच अनुपस्थित पंचसदस्यांबाबत नाराजी

जुन्या गोव्यात गूढ; दोन पुरूषांचे मृतदेह सापडले!

काही तासांतच दोन मृतदेह सापडले. एक पुरूष रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत आढळला आणि दुसरा अन्नपूर्णा बारजवळील नाल्यात तरंगत होता. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

चेतेश्वर पुजाराने केली सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि प्रशंसनीय कसोटी फलंदाजांपैकी एक असलेल्या चेतेश्वर पुजाराने भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने ही बातमी एक्स द्वारे शेअर केली.

ओल्ड गोव्यात रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह

गोव्यातील ओल्ड गोवा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी (दि.२४) सकाळी रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे.

कळंगुटमध्ये आगीत दोन झोपड्या जळून खाक

मध्यरात्री लागलेल्या आगीत स्थानिक मच्छिमारांच्या दोन झोपड्या जळून खाक झाल्या. मासेमारीच्या डुंगा, जाळी आणि जवळच्या झोपडीतील उपकरणेही जळून खाक झाली. पर्वरी, पिळर्ण आणि म्हापसा येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, परंतु काहीही वाचवता आले नाही. २०-२५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

मरड-धारबांदोडा येथील बेकायदेशीर चिरे खाणीवर छापा!

मरड-धारबांदोडा येथील बेकायदेशीर चिरे खाणीवर खाण खात्याचा छापा. एक पावर टिलर व अन्य एक मशीन जप्त. अज्ञाताच्या विरोधात फोंडा पोलीस स्थनाकात गुन्हा नोंद.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT