गोवा

Goa News: सरदेसाई वाड्यावर चतुर्थी संपन्न, विजय सरदेसाईंनी घेतला आशिर्वाद; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Latest News Today: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Sameer Panditrao

सरदेसाई वाड्यावर चतुर्थी संपन्न, विजय सरदेसाईंनी घेतला आशिर्वाद

सावईवेरे येथील सरदेसाई वाड्यावर गणेशाची पूजा संपन्न झाली. आमदार विजय सरदेसाईंनी सपत्नीक आशिर्वाद घेतले. सरदेसाई घरण्याची अनेक कुटूंबे एकत्र गुण्यागोविंदाने गणेश चतुर्थी साजरी करतात. यावेळी मंदार सरदेसाई, संजीव सरदेसाई आणि इतर नातेवाईक उपस्थित होते.

Jammu Rain: जम्मू परिसरात दिवसात 380 मिमी पाऊस

जम्मू आणि परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. फक्त एका दिवसात ३८० मिमी इतका पाऊस झाला असून, हा गेल्या ११५ वर्षांतील (१९१० नंतर) विक्रमी उच्चांक ठरला आहे.

Goa Politics: मंत्री सुभाष फळदेसाई, ढवळीकर यांच्याकडेही नवी जबाबदारी

खातेवाटपानंतर इतर मंत्र्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये देखील काही बदल करण्यात आले आहेत. मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडे पिण्याचे पाणी पुरवठा हे खाते सोपविण्यात आले आहे, तर सुदिन ढवळीकर यांच्याकडे वस्तुसंग्रहालय आणि गॅझेट हे खाते देण्यात आले आहे.

अखेर दिगंबर कामत, रमेश तवडकर यांना खात्यांचे वाटप

मंत्री दिगंबर कामत यांना पीडब्लूडी, बंदर-कप्तान आणि वजन- माप खाते तसेच रमेश तवडकर यांना क्रीडा, आदिवासी कल्याण तसेच कला व संस्कृती ही खाती देण्यात आली आहेत.

Mapusa Market: म्हापसा मार्केटमध्ये दोघांवर हल्ला

म्हापसा मार्केटमध्ये पार्किंग वादावरून दोघांवर हल्ला करण्यात आला आहे. त्यांना इस्पितळात हलवण्यात आले आहे.

हलक्या- मध्यम पावसाच्या सरींसह वाऱ्याचा इशारा

उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या काही भागांमध्ये पुढील ३-४ तासांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसपडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Ravichandran Ashwin IPL Retirement: रविचंद्रन अश्विनची निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू आणि सीएसकेचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Mapusa: म्हापशात कोसळले झाड, अग्निशामक दल दाखल

म्हापसा अग्निशामक केंद्राला कमलाबाई रेस्टॉरंटजवळील पादचारी मार्गावर झाड कोसळल्याची माहिती मिळाली. अग्निशामक व आपत्कालीन सेवा (DFES) विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून, अडथळा दूर करून मार्ग सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्रिपद नाही पण मायकल लोबोंना महामंडळ मिळाले; माजी उपमुख्यमंत्री कवळेकरांना कला अकादमीच्या अध्यक्षपदाची लॉटरी

Shetkari Aadhar Nidhi Scheme: पावसानं झोडपलं, सरकारनं सावरलं, 'डिसेंबरपर्यंत प्रति हेक्टर 40 हजार भरपाई देणार'; CM सावंतांची मोठी घोषणा

Bicholim: डिचोलीत दिवसाढवळ्या इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

Goa Live Updates: खोर्लीत शुक्रवारी आकाशकंदील स्पर्धा

फोंड्यात उभा राहणार रवी नाईक यांचा पुतळा; पालिकेने घेतले तीन महत्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT