Goa beach Dainik Gomantak
गोवा

Goa News: गणेश विसर्जनासाठी 'दृष्टी मरीन'चे 47 ठिकाणी जीवरक्षक राहणार तैनात; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Latest News Today: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी

गोमंतक ऑनलाईन टीम

गणेश विसर्जनासाठी 'दृष्टी मरीन'चे 47 ठिकाणी जीवरक्षक राहणार तैनात,  भक्तांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

गणेश चतुर्थीच्या उत्सवादरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी दृष्टी मरीन या संस्थेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या गणेश विसर्जनाच्या वेळी गोव्यातील विविध विसर्जन स्थळांवर प्रशिक्षित जीवरक्षकांची एक मोठी टीम तैनात केली जाणार आहे. यामध्ये एकूण 47 जागांचा समावेश आहे, ज्यात 35 किनारी आणि 12 अंतर्गत (नदीकाठच्या) स्थळांचा समावेश आहे.

अनमोड येथे 35लिटर दारुसह कार जप्त, सुमारे 5.5 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

अनमोड तपासणी नाक्यावर मंगळवारी (26 ऑगस्ट) सकाळी झालेल्या कारवाईत अबकारी विभागाने 52,900 किंमतीची 35 लिटर दारु आणि 4.5 लाख किंमतीची कार असा एकूण 5.29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयित आरोपी कार्तिक वीरय्या हिरेमठ (रा. हट्टलगिरी रोड, गदग) याला अटक करुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गणेशोत्सवावर पावसाचे सावट! डिचोलीतील माटोळीच्या बाजारात पाण्याचा कहर, गणेशभक्त हवालदिल

कोकण आणि गोव्याचा सर्वात मोठा आणि आवडता सण असलेल्या गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच पावसाने जोरदार हजेरी लावली. गेली दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे डिचोली शहरातील पारंपरिक माटोळीच्या बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. नेहमी गर्दीने फुलून जाणारे बाजारपेठेत सर्वत्र चिखल आणि पाणी साचल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सौभाग्यवती महिलांकडून हरतालिका उत्साहात संपन्न

गणेश चतुर्थीचा आदल्या दिवशी सौभाग्यवती महिलांकडून व्रत करून पुजण्यात येणारे हरतालिका उत्साहात संपन्न झाली. सातोर्डे सत्तरी येथील बर्वे कुटुंबीयांनी विधिवत पूजा करून पारंपरिक पद्धतीने पूजन केले.

चतुर्थीवर पावसाचे सावट

चतुर्थीवर पावसाचे सावट. चतुर्थीच्या पूर्वदिनी पावसाचा कहर. बाजारावर परिणाम. माटोळीच्या बाजारात पाणी. गणेशभक्त नाराज

दिलायला लोबो यांनी शिवोली येथील केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्राचे उद्घाटन केले

आमदार आणि ईएसजीच्या उपाध्यक्षा दिलायला लोबो यांनी सरपंच अमित मोराजकर, पंच सदस्य आणि स्थानिक लोकांसह उपाध्यक्ष मारना शिवोली येथील दांडो येथील नवे भाट येथे २०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्राचे उद्घाटन केले.

मांद्रेचे माजी सरपंच गोवा फॉरवर्ड पक्षात सामील होणार

मांद्रेचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच सदस्य अ‍ॅड अमित सावंत हे आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वी गोवा फॉरवर्ड पक्षात सामील होणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या संघटनातून साकारलेला हा खास गणपती...

बणावलीत जीवनरक्षकाने वाचवले 'प्राण'

बणावली येथे जीवरक्षकाने एका माणसाला जीवन संपवण्यापासून वाचवले.

३० मानसिक आजारी व्यक्ती प्रोव्हेडोरियाच्या स्वाधीन

सरकारी मदतीचा अभाव आणि निधीच्या विलंबामुळे ते आता त्यांची काळजी घेऊ शकत नाहीत असा दावा केल्यानंतर, स्ट्रीट प्रोव्हिडन्स या स्वयंसेवी संस्थेने ३० मानसिक आजारी व्यक्तींना प्रोव्हेडोरियाच्या स्वाधीन केले.

२५ ऑक्टोबरच्या अखेरीस गोवा वॉटर मेट्रो प्रकल्पाला विशेष मदत करण्याचे आश्वासन

२५ ऑक्टोबरच्या अखेरीस केडब्ल्यूएमएलकडून व्यवहार्यता अभ्यास पूर्ण झाल्यानंतर गोवा वॉटर मेट्रो प्रकल्पाला विशेष मदत करण्याचे आश्वासन (बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्रालय) यांनी दिले. नदी वाहतूक मंत्री सुभाष फळदेसाई आणि संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी सोमवार (दि.२५) रात्री केरळमध्ये त्यांची भेट घेतली. ते वॉटर मेट्रोची पाहणी करण्यासाठी कोची येथे गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lawrence Bishnoi: मोठी बातमी! कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सात जणांना गोवा पोलिसांनी घेतले ताब्यात

Kerala Cricket League: 10 चौकार, 18 षटकार! संजू सॅमसनलाही सोडले मागे, केरळ क्रिकेट लीगमध्ये विष्णू विनोदचे 'तूफान'

Ganesh Chaturthi: 'या' वेळेत करा गणरायाची प्रतिष्ठापना! सुख, समृद्धी, ऐश्वर्याने भरेल घर; जाणून घ्या कारण

Viral Video: डोक्यावर पट्टी अन् तुटलेला हात घेऊन फलंदाजी... क्रिकेट वेड्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Bajrang Dal Goa: 'ईद दिवशी जुलूसला परवानगी नको, कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही जबाबदार नाही'! बजरंग दलाचा इशारा

SCROLL FOR NEXT