Goa Today Live Updates Dainik Gomantak
गोवा

Goa News: विजय हजारे ट्रॉफीत गोव्याचा सलग दुसरा विजय; वाचा गोव्यातील महत्वाच्या घडामोडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण,क्रीडा,मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी मराठीमध्ये

Manish Jadhav

विजय हजारे ट्रॉफीत गोव्याचा सलग दुसरा विजय

कर्णधार दीपराज गावकरच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीच्या (७१ धावा आणि ५० धावांत ५ बळी) आणि ललित यादवच्या शानदार शतकाच्या (१०४) जोरावर, गोव्याने विजय हजारे ट्रॉफी लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेच्या एलिट गट 'क' मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला.

Goa Today Live Updates: परवाना काढा, थकबाकी भरा, अन्यथा आस्थापनांना टाळे!

काणकोण पालिका क्षेत्रात काही व्यापारी पालिकेचा व्यापारी परवाना न घेताच व्यवसाय करीत आहेत. काही व्यापाऱ्यांची शुल्क थकबाकी आहे. ती १५ दिवसांत न भरल्यास आस्थापनांना टाळे ठोकण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

पाळोळे, पाटणे व अन्य समुद्र किनाऱ्यांवर काही पर्यटन व्यावसायिक पालिकेचा वैध परवाना न घेता व्यवसाय करत असल्याचे प्रशासनाच्या नजरेस आले आहे. त्यामुळे पालिकेचा महसूल ते बुडवत आहेत. काही पर्यटन व्यावसायिकांची थकबाकी आहे, जी काही लाखांच्या घरात आहे. अशा शुल्क चुकवेगिरांविरुद्ध कारवाई करणे पालिकेला भाग पडले आहे. त्यासाठी सोमवारपर्यंत सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष लक्ष्मण पागी यांनी केले आहे. पालिका मालकीच्या काही जमिनी, पार्किंग जागा आहेत. मात्र, या जागांवर अतिक्रमण होत असून ही अतिक्रमणे रोखण्यासाठी या जमिनीचे डिमार्केशन करून कुंपण घालण्याचा ठराव घेण्यात आला आहे, असे नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी सांगितले.

क्लबसाठी अकबारी खात्याचा परवाना मिळवण्यासाठी बनावट एनओसी; तिघांविरोधात गुन्हा

बर्च बाय रोमिओ लेन क्लबसाठी अकबारी खात्याचा (उत्पादन शुल्क) परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राच्या बनावट नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) वापर केल्या प्रकरणी, जीएस हॉस्पिटॅलिटी एलएलपी या कंपनीच्या अधिकृत व्यक्ती असलेल्या लुथरा बंधू व अजय गुप्ता यांच्याविरुद्ध म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी या बनावटगिरीबाबत गेल्या १७ डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा फसवणूक व बनावटगिरीचा प्रकार १३ डिसेंबरपूर्वी अकबारी खात्याच्या म्हापसा निरीक्षक कार्यालयात घडला आहे.

म्हापसा येथे अपघातात सात वाहनांचे नुकसान

म्हापसा येथील कोर्ट जंक्शनजवळ एका चारचाकी चालकाला गाडी चालवताना अचानक भोवळ आल्याने, त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक दुचाकींना धडक दिली. सुदैवाने जीवितहानी टळली.

या दुर्घटनेत सुमारे सहा ते सात वाहनांचे नुकसान झाले, तर एकजण जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानग्रस्त वाहने बाजूला केली. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

घर रिकामे करण्याच्या नोटीसची गोवा मानवाधिकार आयोगाकडून दखल; सुकूर पंचायतीच्या सचिवांना समन्स

एका सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला घर रिकामे करण्याची नोटीस बजावल्याप्रकरणी गोवा मानवाधिकार आयोगाने (GHRC) स्वत:हून दखल घेतली. या प्रकरणी आयोगाने सुकूर ग्रामपंचायतीच्या सचिवांना समन्स बजावले असून ६ जानेवारी २०२६ पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

डिचोली हादरले! बाजार परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपाताचा संशय

डिचोली शहराच्या मध्यवर्ती बाजार परिसरात एका महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. या घटनेमुळे डिचोलीत भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्राथमिक दृष्ट्या हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: "25 कोटी खर्च झालेत, आता माघार नाही!", युनिटी मॉल हलवण्यास सरकारचा नकार; मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावावर ग्रामस्थ काय उचलणार पाऊल?

Mandrem: सफर गोव्याची! शांततेचा, निवांतपणाचा आणि निसर्गाशी संवाद साधण्याचा अवकाश देणारं 'मांद्रे'

Mandovi Express: प्रवास घाईचा नाही, तर 'चवीचा'! मुंबई-गोवादरम्यान धावणारी फूड क्वीन 'मांडवी एक्सप्रेस'; खवय्यांसाठी का आहे स्वर्ग?

Viral Video: महामार्गावरील 'त्या' हॉटेलबाहेर मृत्यूनं गाठलं, पण एका सेकंदानं उलटला डाव; व्हायरल व्हिडिओवर नेटकरी म्हणाले, 'यमराज' बहुदा सुट्टीवर होते!

Donald Trump: "इराणला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकू!" डोनाल्ड ट्रम्प यांची खुलेआम धमकी; लवकरच पडणार युद्धाची ठिणगी? VIDEO

SCROLL FOR NEXT