Goa live news in Marathi Dainik Gomantak
गोवा

Goa News: साखळीत एका रहिवासी इमारतीचे वीज व पाणी कनेक्शन तोडले

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण,मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्वाच्या घडामोडी.

गोमंतक ऑनलाईन टीम

"500 रुपये मानधन मान्य नाही!" बाल रथ चालकांचा निवडणूक ड्युटीच्या मोबदल्याला नकार

गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीच्या कर्तव्यावर तैनात असलेल्या बाल रथ चालकांनी प्रशासनाने देऊ केलेले मानधन स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पेडणे येथील पेडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील स्ट्राँग रूमबाहेर दोन दिवस ड्युटी केल्यानंतर, चालकांना प्रत्येकी ५०० रुपये मानधन देऊ करण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांच्या कष्टाच्या तुलनेत ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याचे सांगत चालकांनी संताप व्यक्त केला आहे.

गोवा पोलीस दलात पदोन्नती; अजय कृष्ण शर्मा बनले 'आयजीपी', तर राहुल गुप्ता यांचीही बढती

केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) एजीएमयूटी (AGMUT) केडरमधील आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले असून, यामध्ये गोव्यात कार्यरत असलेल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी अजय कृष्ण शर्मा यांची पोलीस महानिरीक्षक (IGP) पदावर पदोन्नती झाली आहे. या बढतीमुळे त्यांची गणना आता गोवा पोलीस दलातील वरिष्ठ नेतृत्वात होणार आहे.

तसेच, सध्या गुन्हे अन्वेषण विभाग (Crime Branch) गोवा येथे पोलीस अधीक्षक (SP) म्हणून कार्यरत असलेले राहुल गुप्ता यांची ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रेड (JAG) मध्ये पदोन्नती करण्यात आली आहे. देशातील २०१७ च्या तुकडीतील ज्या १४ आयपीएस अधिकाऱ्यांना ही श्रेणी प्रदान करण्यात आली आहे, त्यात राहुल गुप्ता यांचा समावेश आहे.

कळंगुट पोलिसांचा 'सेल्फ-ड्राइव्ह' टॅक्सी माफियावर प्रहार

पर्यटकांची वर्दळ असलेल्या कळंगुट परिसरात बेकायदेशीरपणे 'सेल्फ-ड्राइव्ह' टॅक्सी व्यवसाय चालवणाऱ्या तीन जणांविरुद्ध कळंगुट पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.

मडगावच्या खारेबांधमध्ये भरधाव कारचा थरार

मडगाव येथील खारेबांध परिसरात असलेल्या रविराज कॅफेजवळ एका भरधाव कारने भीषण अपघात घडवला. वेगावर नियंत्रण सुटल्याने या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन गाड्या आणि एका स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघाताचा अंगावर शहारे आणणारा सर्व प्रकार जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कार चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, उभ्या असलेल्या वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, चालकाचे वैद्यकीय परीक्षणही केले जाण्याची शक्यता आहे.

उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट' शॅकला भीषण आग

दक्षिण गोव्यातील उतोर्डा समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या 'जॅमिंग गोट' या प्रसिद्ध शॅकला आज (रविवार) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत शॅकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आतील फर्निचर, इलेक्ट्रिक उपकरणे आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

साष्टी तालुक्यात वाहतूक पोलिसांचा 'बडगा'

डगाव आणि आसपासच्या परिसरात पोलिसांनी विशेष नाकाबंदी करून अनेक अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना पकडले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात निवृत्त बँक अधिकारी जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात निवृत्त बँक अधिकारी जखमी. मुळगाव येथील घटना. दिगंबर नाईक असे जखमी निवृत्त बँक अधिकाऱ्याचे नाव.

चोडणच्या 'खरभाट'मध्ये साळींदरचे दर्शन

निसर्गसंपन्न चोडण बेटावरील खरभाट येथे एका दुर्मिळ साळींदरचे दर्शन घडले आहे. रात्रीच्या वेळी हा प्राणी रस्ता ओलांडत असताना काही वाहनचालकांच्या नजरेस पडला.

साखळीत एका रहिवासी इमारतीचे वीज व पाणी कनेक्शन तोडले

हरवळे येथील सिध्दीविनायक कॉम्पेक्स या रहिवासी इमारतीचे सांडपाणी गेले वर्षभर बाहेर सोडल्याने साखळी नगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईतून या इमारतीची वीज व पाणी कनेक्शन तोडण्यात आले आहे. या इमारतीचे सांडपाणी गेले वर्षभर बाहेर वाहत आहे. याची तक्रार साखळी नगरपालिकेत करण्यात आली होती. या इमारतीला नगरपालिकेने अनेकदा नोटीस बाजवूनही कोणतीच उपाययोजना करण्यात न आल्याने अखेर साखळी नगरपालिकेच्या सूचनेनुसार या इमारतीचे वीज व पाणी कनेक्शन तोडण्यात आले आहे. अशाप्रकारे साखळीत उघड्यावर सांडपाणी सोडणाऱ्या इमारती व घरांवर अशा प्रकारची सक्तीची कारवाई केली जाणार आहे, असा इशारा नगराध्यक्षा सिध्दी प्रभू यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा प्राणघातक हल्ला, 23 वर्षीय तरुण गंभीर जखमी; काणकोणातील धक्कादायक घटनेने खळबळ

Labh Drishti Yog 2026: शुक्र-शनीचा 'लाभ दृष्टी योग'! 15 जानेवारीपासून पालटणार 'या' 5 राशींचे नशीब; धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाच्या पराभवाचा खरा विलन कोण? कर्णधार आयुष म्हात्रेची 'ती' चूक भारताला पडली महागात!

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! पाकिस्ताने भारताला 191 धावांनी नमवत उंचावला विजयाचा 'चषक' VIDEO

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT