गोवा

Goa News: जमीन हडप प्रकरणी सुलेमानला पुन्हा आणले गोव्यात VIDEO; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर बातम्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

जमीन हडप प्रकरणी सुलेमानला पुन्हा आणले गोव्यात!

गोव्यातील बहुचर्चित जमीन हडप आणि मालमत्ता फसवणूक प्रकरणातला मुख्य आरोपी सुलेमान सिद्दीकी याला अखेर गोव्यात परत आणण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) न्यायालयात हजर राहण्यास तो वारंवार अपयशी ठरत असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले.

श्री लईराई देवी मंदिराबद्दल पाटकर यांच्या विधानाचा गोवा भाजपने केला निषेध

श्री लईराई देवी मंदिराबद्दलच्या अलिकडच्या विधानाबद्दल गोवा भाजपने गोव्यातील जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "पाटकर यांनी निर्लज्जपणे दावा केला की 'श्री लईराई लैराई मंदिर सरकारने विकले आहे', हे विधान लज्जास्पद आणि गंभीरपणे आक्षेपार्ह आहे. अशा प्रकारच्या टिप्पणी अत्यंत निषेधार्ह आहेत. काँग्रेस पक्षाने वारंवार हिंदूविरोधी भूमिका दाखवली आहे यात आश्चर्य नाही. आम्ही त्यांना आमच्या देवी-देवतांना त्यांच्या स्वस्त राजकीय खेळांपासून दूर ठेवण्याचे आवाहन करतो"; भाजप गोवाने 'X' पोस्ट केले.

केरी येथे गोमांस वाहतूक करणारे वाहन अडवले!

बेळगावहून मडगावला गोमांस वाहतूक करणारे वाहन तरुणांनी केरी सीमा तपासणी नाक्यावर रोखले. हेच वाहन ८ दिवसांपूर्वी मोले तपासणी नाक्यावर पकडण्यात आले होते.

रमा काणकोणकर यांच्या पत्नीने पणजी पोलीस निरीक्षकाविरुद्ध दाखल केली तक्रार

रमा काणकोणकर यांच्या पत्नीने पणजी पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली; गुन्हे शाखा किंवा निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशीची मागणी.

रती काणकोणकर दुपारी १.३० वाजता डीजीपींना भेटणार

कार्यकर्त्या रमा काणकोणकर यांच्या पत्नी रती काणकोणकर दुपारी १.३० वाजता डीजीपींना भेटल्यानंतर आझाद मैदान पणजी येथे माध्यमांना माहिती देतील.

टायकोंडो संघांची निवड करण्यासाठी रेफ्रि गैरहजर

टायकोंडो संघांची निवड करण्यासाठी रेफ्रि गैरहजर. सकाळीपासून खेळाडू उपाशी. कुर्टी मैदानावर पालक संतप्त.

संस्कृती राखून ठेवणाऱ्या पूर्वजांना "हेटस् ऑफ" मुख्यमंत्री

इंग्रजांनी देशावर दिडशे वर्षे राज्य केले, पण पोर्तुगीजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले. तरीही आमच्या जाणत्यांनी गोव्याची सांस्कृतिक ठेव, विविध गीते, धालो मांड त्याच चालीत व शब्दशः जिवंत ठेवले. त्या आमच्या जाणत्यांना हेटस् ऑफ. त्यांनी हि ठेव आहे तशीच पुढील पिढीला सुपूर्द केली.

वरद सामंत यांची गोव्याचे कृषी राजदूत म्हणून नियुक्ती

गोवा सरकारने भाजीपाला लागवडीत "स्वयंपूर्ण" होण्याच्या राज्याच्या ध्येयाला चालना देण्यासाठी प्रगतीशील शेतकरी वरद सामंत यांची कृषी राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. ते उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेजारच्या राज्यांमधून भाजीपाला आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.

पॉल लोबो आणि सॅटर्निनो रॉड्रिग्ज यांचा समर्थकांसह पक्षातून राजीनामा

आपचे प्रमुख नेते पॉल लोबो आणि सॅटर्निनो रॉड्रिग्ज यांनी त्यांच्या समर्थकांसह पक्षातून राजीनामा दिला आहे, ज्यामुळे बाणावलीमधील आमदार वेन्झी यांचे स्थान कमकुवत झाले आहे. त्यांनी म्हटले की विकास होत नाही, फक्त अहंकार आहे आणि वेन्झी त्यांच्या समर्थकांकडे दुर्लक्ष करतात.

कोलवाळ हायवेवरील एचपी पेट्रोल पंपाजवळ एका बलेनो कारची दुचाकीला धडक

रविवारी कोलवाळ हायवेवरील एचपी पेट्रोल पंपाजवळ एका बलेनो कारने पेट्रोल पंपातून बाहेर पडणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने मोठा अपघात झाला. दोन्ही स्वार गंभीर जखमी झाले आणि त्यांना म्हापसा येथील असिलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

फर्मागुडी येथील जीव्हीएम सर्कल जवळ कार व स्कुटर यांच्यात अपघात

फर्मागुडी येथील जीव्हीएम सर्कल जवळ कार व स्कुटर यांच्यात अपघात. प्रमिला नाईक (५०, फर्मागुडी) ही नर्स जखमी. गोमेकोत दाखल

सत्तारीतील भुईपाल येथे अपहरणाचा प्रयत्न

सत्तारीतील भुईपाल येथे एका अज्ञात व्यक्तीने एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. अपहरणकर्त्याला चावल्यानंतर तो मुलगा पळून जाण्यात यशस्वी झाला. पीडित आणि त्याच्या पालकांनी वाळपोई पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Case: 'नीलेश शिरवईकरला बडतर्फ करा'! नावेलीवासीयांची मागणी; एडबर्ग मारहाणीच्या निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा

Goa Politics: खरी कुजबुज; पेडणे तालुका नेहमीच चर्चेत

Goa Vehicle Sales: गोव्यात दिवाळीदरम्यान 'रेकॉर्डब्रेक' वाहन खरेदी! GST कपातीमुळे ग्राहकांची पसंती; 11317 गाड्यांची नोंदणी

Horoscope: मोठा धमाका! अडकलेले पैसे मिळणार; आठवड्याची सुरुवात 'या' राशींना देणार भरभरून

Montha Cyclone: ‘मोंथा’बाबत मोठी अपडेट! 'गोव्यात' पाऊस थांबणार की नाही? वाचा माहिती..

SCROLL FOR NEXT