Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

Goa News: भाजपविरुद्ध सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे अशी गोवेकरांची इच्छा, अमित पाटकर; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Braking News: जाणून घ्या राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गोव्यातील ताज्या-ठळक घडामोडी मराठीमध्ये.

गोमंतक ऑनलाईन टीम

नाणूस-उसगाव एसटी समुदायाचा एल्गार! बिगर-गोमंतकीयांनी केलेल्या अतिक्रमणांविरोधात निषेध

नाणूस-उसगाव येथील एसटी समुदायाने स्थानिक जमिनींवर बिगर-गोमंतकीय स्थलांतरितांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधात तीव्र निषेध नोंदवला आहे. त्यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, या बेकायदेशीर बांधकामांवर त्वरित आणि कडक कारवाई करावी. जर पुढील पंधरा दिवसांत कोणतीही कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा एसटी समुदायाने दिला आहे.

डांगी कॉलनीत अवैध व्यावसायिक स्वयंपाकघर सील; व्यापार परवाना, फायर NOC नव्हते

म्हापसा नगरपालिकेच्या (MMC) अधिकाऱ्यांनी आज, बुधवारी डांगी कॉलनी, प्रभाग क्र. ५ येथे बेकायदेशीरपणे चालणाऱ्या एका व्यावसायिक स्वयंपाकघराची पाहणी केली. आवश्यक असलेला व्यापार परवाना आणि फायर NOC नसताना हे स्वयंपाकघर चालवले जात होते. प्रभाग क्र. ६ चे नगरसेवक ॲड. शशांक नार्वेकर यांनी स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर हा मुद्दा उपस्थित केला होता.

शिरोली पंचायत क्षेत्रातील पाच जागेत रस्ता डांबरीकरणाची सुरुवात

शिरोली पंचायत क्षेत्रातील एकूण पाच जागेत रस्ता डांबरीकरणाची आमदार दिलायला लोबो यांच्या उपस्थितीत सुरुवात.

हायकोर्टात सरकारची मोठी ग्वाही; 'तीन' खाणकाम योजना आणि नकाशे सादर करणार

राज्यातील खाणकाम प्रकरणातील एका महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान सरकारने उच्च न्यायालयासमोर मोठी ग्वाही दिली आहे. सरकारने पुढील तीन आठवड्यांत तीन विशिष्ट आणि कृतीयोग्य खाणकाम योजना आणि त्यांचे नकाशे सादर करण्याचे मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जानेवारी २०२६ पर्यंत तहकूब केली आहे.

भाजपविरुद्ध सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे अशी गोवेकरांची इच्छा: अमित पाटकर

गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी महत्त्वपूर्ण राजकीय विधान केले आहे. गोव्यातील जनतेची इच्छा आहे की, भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढावे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसची आघाडी आणि जागावाटपाची चर्चा सध्या सुरू आहे. ही चर्चा अंतिम झाल्यानंतर उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल, असे पाटकर यांनी स्पष्ट केले आहे.

ICAR-CCARI, गोव्याला 'राष्ट्रीय जल पुरस्कार 2024' ने सन्मानित

गोवा येथील ICAR–केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्थाला 'कॅम्पस जल संवर्धनातील उत्कृष्टतेसाठी' 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' मध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही संस्था जल संवर्धनामध्ये उत्कृष्ट कार्य करत आहे.

बायणा दरोड्यात 15 वर्षीय मुलीचे शौर्य; कुटुंबाचा जीव वाचवला!

बायणा येथील दरोड्याच्या वेळी एका १५ वर्षीय मुलीने दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे तिच्या आई-वडिलांचा जीव वाचला. दरोडेखोरांनी हल्ला केल्यावर जखमी अवस्थेत असतानाही तिने खिडकीतून निसटून शेजाऱ्यांकडे मदतीसाठी धाव घेतली. दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियाटो फर्नांडिस यांनी कुटुंबाची भेट घेतली आणि या धाडसी मुलीला वीरता पुरस्कार मिळायला हवा, असे मत व्यक्त केले.

जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कुटुंबासाठी, समाजासाठी आणि आपल्या कामाच्या माध्यमातून तुम्ही देत असलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी तुमचे मनःपूर्वक आभार! तुमचा संघर्ष, त्याग आणि योगदान नेहमीच प्रेरणादायी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT