नववर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वण-डिचोलीत भयानक अपघात. स्कुटरला धडक दिल्यानंतर कार पलटली. स्कुटरचा चक्काचूर. कार आणि स्कुटरचालक सुखरूप.
गोवा सरकारने 'गोवा भू-महसूल संहिते'अंतर्गत उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि नवनिर्मित कुशावती जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अधिकृतपणे अधिसूचित केल्या आहेत. या अधिसूचनेमुळे नवीन 'कुशावती' जिल्ह्यातील महसूल प्रशासन आता खऱ्या अर्थाने कार्यान्वित झाले आहे. तिसऱ्या जिल्ह्याच्या घोषणेनंतर प्रशासकीय यंत्रणा उभारण्याच्या दिशेने सरकारने उचललेले हे सर्वात महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यामुळे नवीन जिल्ह्यातील नागरिकांना आता स्थानिक पातळीवरच महसूल संबंधित सेवा उपलब्ध होणार आहेत.
हडफडे आगीच्या घटनेनंतर प्रशासनाने सील केलेले काही नाईट क्लब नियमांचे पालन आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पुन्हा सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी राज्यात एका स्पष्ट 'क्लब पॉलिसी'ची गरज असल्याचे प्रतिपादन केले आहे. लोबो म्हणाले की, नियमांचे पालन करणाऱ्या क्लबांना व्यवसाय करण्याची परवानगी मिळायला हवी.
वेर्णा पोलिसांनी काँग्रेस नेते ओलेन्सिओ सिमोस यांच्या विरोधात कुठ्ठाळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष पीटर डिसोझा यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पक्षाच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन करून आयोजित केलेल्या ब्लॉक कमिटीच्या बैठकीबाबत जाब विचारला असता ही मारहाण झाल्याचा दावा डिसोझा यांनी केला आहे.
तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीमुळे जिल्हा पंचायतींना अधिक अधिकार मिळत असल्याबद्दल आमदार दिव्या राणे यांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्हा पंचायतींचे सक्षमीकरण होणे ही चांगली बाब असल्याचे सांगतानाच, त्यांनी भविष्यात आमदारांनाही अधिक अधिकार मिळायला हवेत, असे मत व्यक्त केले.
हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' येथे झालेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (GSPCB) मोठी कारवाई केली आहे. योग्य प्रकारे तपासणी न केल्याचा ठपका ठेवत वैज्ञानिक सहाय्यक चैतन्य साळगावकर आणि कनिष्ठ पर्यावरण अभियंता विजय हरिचंद्र कानसेकर या दोघांना निलंबित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कारवाईची पुष्टी केली असून, इतर कोणत्याही विभागाचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित केले जाईल, असा इशारा दिला आहे.
गोव्याच्या तिसऱ्या जिल्ह्याच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला दिलासा दिला आहे. "लोकांनी घाबरण्याची गरज नाही", असे आश्वासन त्यांनी दिले. जिल्ह्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने, सध्या सर्व प्रशासकीय जबाबदाऱ्या दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडेच राहतील आणि तातडीने कोणतेही बदल केले जाणार नाहीत. नवीन जिल्हाधिकारी नियुक्त होईपर्यंत सध्याची व्यवस्था कायम राहील. तसेच, नागरिकांच्या सोयीसाठी केपे ते काणकोण घाट दरम्यान लवकरच बस सेवा सुरू केली जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
गोव्याच्या तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीसोबतच आता राज्यात तिसरी जिल्हा पंचायत देखील अस्तित्वात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली असून, नवीन जिल्हा पंचायतीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नियुक्ती लवकरच केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज एक मोठी घोषणा केली असून, राज्याच्या प्रस्तावित तिसऱ्या जिल्ह्याचे नाव 'कुशावती' असे असेल, असे स्पष्ट केले आहे. यापूर्वी या जिल्ह्यासाठी 'अटल' या नावाची चर्चा सुरू होती, मात्र आता मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे 'कुशावती' या नावावर शिक्कामोर्तब केले आहे
चिंबल येथे प्रस्तावित 'युनिटी मॉल'विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनात आम आदमी पार्टीचे (AAP) नेते अमित पालेकर सहभागी झाले आहेत. ग्रामस्थांच्या मागणीला पाठिंबा देत पालेकर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. या गंभीर प्रश्नावर प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. "जनतेचा विरोध डावलून लादले जाणारे प्रकल्प खपवून घेतले जाणार नाहीत," असा इशारा देत पालेकर यांनी आंदोलकांशी संवाद साधला आणि या लढ्यात पूर्णपणे सोबत राहण्याचे आश्वासन दिले.
पणजीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या मागील बाजूस असलेल्या मोठ्या क्षेत्रातील खारफुटी सुकल्या असून त्या नष्ट होत असल्याचे समोर आले आहे. प्रकल्पातील प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि मैला पाणी थेट नैसर्गिक जलस्त्रोतात सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक सूत्रांनी केला आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, मौल्यवान खारफुटी परिसंस्थेचे गंभीर नुकसान होत आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
गोव्यात लवकरच तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती होण्याची शक्यता असून, या जिल्ह्याला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ 'अटल' असे नाव दिले जाण्याचे संकेत मिळत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, केपे हे या नवीन जिल्ह्याचे मुख्यालय असण्याची दाट शक्यता असून, यामध्ये केपे, सांगे, काणकोण आणि धारबांदोडा या चार तालुक्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, विरोधकांनी या नावाला विरोध दर्शवलेला नाही; मात्र अंतिम निर्णयापूर्वी जनतेशी सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.