Goa latest updates Dainik Gomantak
गोवा

Goa News: कोरगाव पंचायतीचे पंच अब्दुल नाईक यांच्या भावाला मारहाण; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकीय, क्रीडा आणि इतर बातम्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

४,६८,७७५ रुपयांची फसवणूक, अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल

काईट फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणुकीद्वारे उच्च परतावा देण्याच्या बहाण्याने डिचोली रहिवाशाची ४,६८,७७५ रुपयांची फसवणूक केल्याबद्दल डिचोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

कोरगाव पंचायतीचे पंच अब्दुल नाईक यांच्या भावाला मारहाण

कोरगाव पंचायतीचे पंच अब्दुल नाईक यांच्या भावाला राहुल भगत ( कोरगाव- पेडणे )याने केली मारहाण. नाईक यांच्या कुटुंबीयांची पेडणे पोलीस स्थानकात धाव घेऊन भगत याला अटक करण्याची केली मागणी. पोलिसांनी गुन्हा नोंद.

मुंगुल हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक

मुंगुल हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. आणखी अटक होण्याची शक्यता आहे. हल्ल्यात वापरलेली वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

शाळा, भजनी मंडळे व स्वयं-साहाय्य गटांना भजन साहित्याचे वाटप

आमदार डॉ. देविया राणे यांच्या हस्ते पर्ये मतदारसंघातील विविध शाळा, भजनी मंडळे व स्वयं-साहाय्य गटांना भजन साहित्याचे वाटप.

लाख किमतीचे सोने लुटलेल्या व्यक्तीला अटक

एका जलद आणि निर्णायक कारवाईत, पणजी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली ज्याने स्वतःला डॉक्टर म्हणून ओळख करून बनावट गुगल पे व्यवहाराचा वापर करून एका दागिन्यांच्या दुकानातून 2 लाख किमतीचे सोने लुटले.

फातोर्डा पोलिसांनी केली पाच आरोपींविरुद्ध लूकआउट नोटीस जारी

फातोर्डा पोलिसांनी मुंगुल हल्ला प्रकरणातील पाच जणांविरुद्ध बीएनएस आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली लूकआउट नोटीस जारी केली आहे. पोलिसांनी जनतेला आरोपींबद्दल कोणतीही माहिती फातोर्डा पोलिस स्टेशनला देण्याचे आवाहन केले आहे, माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल याची खात्री दिली आहे.

गोवा काँग्रेस नेत्यांना घेतलं ताब्यात

गोवा काँग्रेसचा आझाद मैदानाजवळ सीईओ कार्यालयाकडे जाणारा निषेध मोर्चा पोलिसांनी रोखला; काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले; काल दिल्लीत अटक करण्यात आलेल्या एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि भारत ब्लॉक खासदारांच्या विरोधात आणि मतदार यादी पुनरावृत्तीमध्ये पक्षपात केल्याच्या आरोपाखाली निषेध करण्यात आला.

गोवा प्रदेश काँग्रेसने राज्यातील मतदारसंघांमध्ये अनेक बनावट मतदार नोंदणी असल्याचा केला आरोप

गोवा काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी पुढे सांगितले की गेल्या दोन महिन्यांपासून काल रात्रीपर्यंत गोव्यात मुख्य निवडणूक अधिकारी नव्हते. रात्री उशिरा संजय गोयल यांची अचानक या पदावर नियुक्ती करण्यात आली.

गोवा बीच सफाई कामगारांना सूचना न देता कामावरून काढले

बागा, कळंगुट, कांदोळी, शिकेरी आणि कोको बीच सफाई कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे की इकोस्टन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडने पूर्वसूचना किंवा स्पष्टीकरण न देता अचानक त्यांच्या सेवा काढून टाकल्या.

प्रभावित झालेल्यांमध्ये १ फील्ड ऑफिसर, ५ पर्यवेक्षक, २ कार्यकारी पर्यवेक्षक, १८ बीच कामगार, ७ लोडर आणि ३ ड्रायव्हर्स यांचा समावेश आहे, ज्यांपैकी अनेकांना १६ वर्षांपर्यंतचा अनुभव आहे. कामगारांचे म्हणणे आहे की ते व्यवस्थापनाकडून त्यांच्या समस्या सोडवण्याची वाट पाहत आहेत, परंतु कोणताही प्रतिनिधी त्यांना भेटलेला नाही किंवा त्यांच्याशी बोललेला नाही.

मुंगुल येथे झालेल्या टोळी हल्ल्याच्या पार्श्वभूमीव दक्षिण गोवा एसपींनी बोलावली बैठक

मुंगुल येथे झालेल्या टोळी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा एसपींनी डीवायएसपी साष्टी आणि अधिकारक्षेत्रातील सर्व पीआयसोबत एक बैठक बोलावली.

पासिंग-आउट परेडला मुख्यमंत्री आसाममध्ये

आसाममध्ये प्रशिक्षित झालेल्या गोवा पोलिस भरतीच्या पासिंग-आउट परेडला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते.

नार्वेत जत्रेचा उत्साह, आमदार प्रेमेंद्र शेट यांनी घेतले दर्शन

नार्वेत जत्रेचा उत्साह. मसणदेवीच्या जत्रेला परंपरेप्रमाणे उत्साहात प्रारंभ. सकाळपासूनच भक्तांची गर्दी. फक्त दिवसाच साजरी होतेय जत्रा. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी घेतले देवीचे दर्शन

मुंगूल गोळीबार प्रकरण; प्राथमिक तपासात दोन टोळ्यांमधील गोळी युद्ध असल्याचे स्पष्ट

प्राथमिक तपासात दोन टोळ्यांमधील गोळी युद्ध असल्याचे दिसून आले आहे. एक जिवंत काडतूस देखील जप्त करण्यात आले आहे, असे एसपी दक्षिण टिकम सिंह वर्मा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT