Goa Arrest News Dainik Gomantak
गोवा

Goa News: सिंधुदुर्गातील पर्यटकांना मारहाण, एकाला अटक; गोव्यातील ठळक बातम्या

Goa News: जाणून घ्या गोव्यातील राजकीय, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी.

Sameer Amunekar

सिंधुदुर्गातील पर्यटकांना मारहाण; एकाला अटक

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथील पर्यटकांना मारहाण केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. वेंगुर्ला येथून पर्यटनासाठी आलेल्या मुलांना मारहाण केल्याची घटना भोम, पालये येथे उघडकीस आली होती. यात चारजण जखमी झाले आहेत.

Goa Illegal Sand Mining: मांडवी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा, एकाला अटक

पणजी कोस्टल सिक्युरिटी पोलिसांनी मांडवी नदीतून बेकायदेशीर वाळू उपसा केल्याप्रकरणी समीर मोंडल (वय - ३० वर्ष, रा. पश्चिम बंगाल) याला अटक केली.

Tourist Assault Goa: वेंगुर्ल्यातील पर्यटकांना मारहाणी प्रकरणी ९ जणांवर गुन्हा नोंद

भोम पालये येथे वेंगुर्ल्यातील पर्यटकांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेत हरमल येथील ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Betoda Junction Traffic signal: बेतोडा जंक्शनवर मार्चपर्यंत ट्रॅफिक सिग्नल

फोंडा तालुक्यात पहिल्यांदा बेतोडा जंक्शनवर मार्चपर्यंत सिग्नल बसविण्यात येणार आहे. महामार्ग अधिकाऱ्याकडून मंजुरी देण्यात आली, अशी माहिती सरपंच मधू खांडेपारकर यांनी दिलीय.

Pramod Sawant: महात्मा गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण झाले : मुख्यमंत्री

स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत महात्मा गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे नेले आहे. त्याचे फायदे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. त्यांचे स्वप्न सत्यात उतरले; महात्मा गांधींना हीच खरी श्रद्धांजली आहे, असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणालेत.

Drowning Incident: स्विमिंग पुलमध्ये बुडून तीन वर्षीय मुलाचा मृत्यू

साळगावमध्ये एका तीन वर्षांच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये चुकून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.

Goa Police on Beach Shacks: मांद्रेतील शॅक रात्री ११ नंतर बंद करा, पोलिसांची सूचना

मांद्रे मतदार संघातील किनारी भागातील सर्व शॅक रात्री 11 पर्यंत बंद करावे तसेच लाऊड म्युझिकही नको, अशी सूचना मांद्रे पोलिसांनी व्यावसायिकांना दिलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT