कुत्र्यामुळे मालक गोत्यात! रॉटवेलरने घेतला 40 वर्षीय तरुणाच्या पायाचा चावा, मालकाविरुद्ध गुन्हा

Rottweiler Attack Case: पोलिसांनी कुत्र्याचे मालक श्याम गोवेकर यांच्याविरुद्ध 'बीएनएस'च्या २९१ कलमांतर्गत गुन्हा नोंद केला.
Anjuna: कुत्र्यामुळे मालक गोत्यात! रॉटवेलरने घेतला 40 वर्षीय तरुणाच्या पायाचा चावा, मालकाविरुद्ध गुन्हा
Rottweiler
Published on
Updated on

Rottweiler Attack Case Anjuna

म्हापसा: यापूर्वी रॉटवेलर कुत्र्याच्या हल्ल्यात एका निष्पाप बालकाचा बळी गेला असताना बादे-आसगाव येथे रॉटवेलर कुत्र्याने ४० वर्षीय तरुणाच्या पायाचा चावा घेतला. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी या हिंस्त्र प्रजातीच्या कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला. या कुत्र्याच्या हल्ल्यात विनिल साळगावकर हा जखमी झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना २९ जानेवारी रोजी रात्री १०.३०च्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित युवकाचा भाऊ फिर्यादी आहे. विनिल हा मोबाईलवर बोलून झाल्यानंतर चालत घरी येताना अचानक या कुत्र्याने विनिलच्या डाव्या पायाला चावा घेतला.

Anjuna: कुत्र्यामुळे मालक गोत्यात! रॉटवेलरने घेतला 40 वर्षीय तरुणाच्या पायाचा चावा, मालकाविरुद्ध गुन्हा
Calangute: वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर, हॉकर्सवर कारवाई; कळंगुट पोलिस अ‍ॅक्शन मोडवर

परिणामी विनिलच्या पायाला जखम झाली. त्यानंतर विनिलला तत्काळ शिवोली आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी विनिलचे भाऊ सुनील साळगावकर यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी कुत्र्याचे मालक श्याम गोवेकर यांच्याविरुद्ध 'बीएनएस'च्या २९१ कलमांतर्गत गुन्हा नोंद केला.

Anjuna: कुत्र्यामुळे मालक गोत्यात! रॉटवेलरने घेतला 40 वर्षीय तरुणाच्या पायाचा चावा, मालकाविरुद्ध गुन्हा
Calangute: वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर, हॉकर्सवर कारवाई; कळंगुट पोलिस अ‍ॅक्शन मोडवर

राज्यात बंदी लागू; तरीही...

रॉटवेलर ही कुत्र्यांची प्रजाती आक्रमकतेसाठी ओळखली जाते. हणजूण येथेच २९ ऑगस्ट २०२४ रोजी अशाचप्रकारे एका रॉटवेलरच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने रॉटवेलर आणि तत्सम हिंस्त्र कुत्र्यांच्या प्रजातींवर बंदी घातली होती.

तसेच पशुसंवर्धन खात्याने याविषयी नियमावली व अटी जारी केल्या होत्या. मात्र, ही बंदी केवळ कागदोपत्रीच असल्याचे सिद्ध झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com