Dainik Gomantak
गोवा

Goa News: पुण्यातील मोबाईल चोराला पोलिसांनी किनाऱ्यावर पकडले

Goa Marathi News 25 January 2025: गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Akshata Chhatre

Goa Theft: पुण्यातील मोबाईल चोराला पोलिसांनी किनाऱ्यावर पकडले

गोवा पर्यटन पोलिसांनी समुद्रकिनारी गस्त घालत असताना एका मोबाईल चोराला पकडले, पोलिसांना मिलेल्या माहितीनुसार हा माणूस पुणे, महाराष्ट्राचा आहे. यांनतर दिल्लीतील एक व्यक्ती हजर झाला आणि त्याने सदर फोन हा त्याचा असल्याचे सांगितले आणि योग्य पडताळणी केल्यानंतर हा फोन त्याच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Goa Accident: दोन खांब जंक्शन जवळ चारचाकी आणि ट्रक यांचा अपघात

धारगळ येथे दोन खांब जंक्शन जवळ चारचाकी आणि ट्रक यांचा अपघात झाला. सध्या या ठिकाणी अपघात वाढत असल्याने उड्डाणपुलाचे काम लवकर व्हावे अशी मागणी स्थानिकांकडून केली जातेय.

Goa Yuva Mahotsav: गोवा युवा महोत्सवाला डिचोलीत प्रारंभ

अभूतपूर्व उत्साहात गोवा युवा महोत्सवाला डिचोलीत प्रारंभ. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन. शेकडो युवक-युवतींचा सहभाग.

Yuva Konkani Mahotsav: युवा कोकणी महोत्सवाला मुख्यमंत्र्यांना शेवटच्या क्षणी निमंत्रण

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना युवा कोकणी महोत्सवाचे शेवटच्या क्षणी निमंत्रण. नाराजी बाजूला ठेवून कोंकणीवरील प्रेमापोटी महोत्सवाला हजेरी लावल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट.

Goa Accident: बांबोळी येथील उड्डाणपूलावर दोन चारचाकींचा भीषण अपघात

बांबोळी येथील उड्डाणपूलावर दोन चारचाकींचा भीषण अपघात झाला, गाड्यांचे नुकसान झाले मात्र सुदैवाने हा अपघात कुणाच्याही जीवावर बेतला नाही.

Cyber Crime News: क्रिप्टोमधून गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून 4.82 कोटींचा गंडा

क्रिप्टो करन्सीमधून गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून कुडचडे येथील कुटुंबाला ४.८२ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला.

Republic Day: प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने केलेल्या विशेष रोषणाईवर स्थानिकांनी व्यक्त केली चिंता

केपेच्या रहिवाशांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने केलेल्या विशेष रोषणाईवर चिंता व्यक्त केली आहे. रहिवासी म्हणतायत की ही रोषणाई ध्वजाच्या रंगांशी अचूकपणे मिळत नाही. सामान्यत: उपजिल्हाधिकारी इमारत आणि आरटीओ कार्यालयात रोषणाई केली जाते.

Goa Culture: श्रीरुद्रेश्वर देवाच्या रथयात्रेचे डिचोलीत उत्साही स्वागत

श्री रुद्रेश्वर देवाच्या रथयात्रेचे डिचोलीत उत्साही स्वागत. रुद्रेश्वराचा जयघोष आणि बॅण्डवादनासह डिचोलीत रथयात्रा. विविध गावांनी रथयात्रा फिरणार.

Goa Tourism: गोव्यात पॅराग्लायडिंगवर सरकारी बंदी

पर्यटन विभागाकडून पुढील आदेश येईपर्यंत संपूर्ण गोवा राज्यामध्ये पॅराग्लायडिंग क्रियाकलाप बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आले आहेत. पॅराग्लायडिंगमध्ये व्यवसाय करणाऱ्या सर्व ऑपरेटरना परवाना आणि कागदपत्रे पर्यटन विभागाकडे सादर करणे आवश्यक असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT