Goa Marathi news  Dainik Gomantak
गोवा

Goa News: मांडवी पुलाजवळ रस्त्यावर झाड कोसळले

Goa Marathi Breaking News 20 July 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण,क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी.

गोमंतक ऑनलाईन टीम

मांडवी पुलाजवळ रस्त्यावर झाड कोसळले

मांडवी पुलाजवळ रस्त्यावर झाड कोसळले.सुदैवाने कोणतीही दुखापत किंवा नुकसान झाले नाही.

"मी गोव्याचे प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करेन" सरदेसाई

संयुक्त विरोधकांनी सर्वात मोठ्या विधानसभेच्या अधिवेशनाची तयारी केली नाही का? मी गोव्याच्या हितासाठी शक्य तितके एकत्र राहण्याचा, गोव्याचे प्रश्न उपस्थित करण्याचा, गोव्यातील लोकांच्या हितासाठी आणि फायद्यांसाठी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेन. शक्य तितके, मी जिथे शक्य असेल तिथे समन्वय साधण्याचा प्रयत्न करेन.

गांजे - उसगाव येथील खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात

गांजे - उसगाव येथील सरकारी हायस्कुल जवळील खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला वीज खात्यातर्फे सुरुवात. त्वरित दुरुस्ती न केल्यास फोंडा ते वाळपई मार्गांवरील वाहतूक रोखण्याचा ग्रामस्थांनी दिला होता इशारा

साखळी गणेशोत्सव मंडळाच्या लॉटरी विक्रीचा शुभारंभ

साखळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे काढण्यात आलेल्या लॉटरी तिकीट विक्रीचा शुभारंभ पद्मिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. साखळी गणेशोत्सव मंडळाचा यावर्षी ४५ वा गणेशोत्सव असून संस्था स्थापन करून सातत्य राखणे व नियमितपणे कार्यक्रम व कार्य करणे हे मोठे आव्हान आहे. साखळी गणेशोत्सव मंडळातील प्रत्येक सदस्याने या मंडळासाठी व उत्सवासाठी भरीव योगदान दिल्याने या मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे, असे यावेळी सुलक्षणा सावंत यांनी म्हटले.

राजीव गांधी कला मंदिर येथे बत्ती गुल!

फोंडा मतदारसंघातील एस.एस.सी. आणि एच.एस.एस.सी. गोवा बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, परंतु अचानक वीज गेल्याने सत्कार समारंभात व्यत्यय आला आणि तो निराशेत बदलला.

मागण्यांसाठी पेडणेवासी एकवटले!

तुये इस्पितळ गोमेकॉशी लिंक करावे तसेच इस्पितळ प्रकल्पात तयार होणाऱ्या रोजगारांत पेडणेकरांनाच प्राधान्य द्यावे, या दोन मागण्यांसाठी तुये इस्पितळ कृती समितीतर्फे जाहीर सभा सुरू.

तुये हॉस्पिटल कृती समितीतर्फे जाहीर सभा सुरू

तुये हॉस्पिटल जीएमसी लिंक आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून तयार होणाऱ्या रोजगारात पेडेकरांनाच प्राधान्य द्यावे. या दोन मागणीसाठी तुये हॉस्पिटल कृती समितीतर्फे जाहीर सभा सुरू

श्रमधाम बैठक,सभापती तवडकर प्रियोळात एक्टीव्ह

गोवा विधानसभेचे सभापती डॉ.रमेश तवडकरांचे बाणस्तारीतील श्रमधाम बैठकीला मार्गदर्शन.बैठकीला मोठी उपस्थिती. २३ ऑगस्ट रोजी कला अकादमीत होणाऱ्या राज्यव्यापी श्रमधाम अधिवेशनाबद्दल दिली माहिती

गोव्याची श्रुंगी बांदेकर बर्लिन येथे होणाऱ्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत भाग घेण्यासाठी सज्ज

बंगळुरू येथील जैन विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारी श्रुंगी बांदेकर १७ ते २३ जुलै दरम्यान बर्लिन येथे होणाऱ्या प्रतिष्ठित जागतिक विद्यापीठ स्पर्धेत भाग घेणार आहे. ती ४०० मीटर आणि २०० मीटर वैयक्तिक मेडली, २०० मीटर बॅकस्ट्रोक, तसेच फ्रीस्टाइल आणि मेडली रिले इव्हेंटसह अनेक जलतरण स्पर्धांमध्ये भाग घेईल आणि जागतिक स्तरावर भारताचे अभिमानाने प्रतिनिधित्व करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Health Horoscope: 'या' आठवड्यात आरोग्य बिघडण्याची शक्यता! 'या' राशींनी टाळावा ताण आणि चुकीचा आहार

British Fighter Jet: ब्रिटनच्या फायटर जेटचे जपानमध्ये इमर्जन्सी लँडिंग, दीड महिन्यातील दुसरी घटना; चीन-रशियाने उडवली खिल्ली

Ganesh Pooja: 'घाईत केलेली पूजाही ठरते पावन, पण...'; मनाप्रमाणे फळ मिळवण्यासाठी पुजाऱ्यांनी सांगितले रहस्य

Kalasa Banduri Project: कळसा-भंडुरावर मोठी अपडेट! कर्नाटकच्या राज्यपालांनी दिला 9.27 एकर जमीन ताब्यात घेण्याचा आदेश

Digital Arrest: सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट स्कॅम! गोमंतकीय नागरिकाला 1.05 कोटींचा गंडा; केरळमधून एकाला अटक

SCROLL FOR NEXT