Goa Monsoon 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोव्याला यलो अलर्ट, कॅसिनो जेटीखाली आढळली मृत म्हैस; राज्यातील महत्वाच्या बातम्या

Goa Marathi Breaking News 16 July 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी

गोमंतक ऑनलाईन टीम

बेतोडा पंचायतीचे सरपंच मधू खांडेपारकर यांची सरपंचाची खुर्ची

बेतोडा पंचायतीचे सरपंच मधू खांडेपारकर यांच्यावर दाखल झालेला अविश्वास ठराव बारगळ्यानंतर सरपंचाची खुर्ची अधिक बळकट झाली. पण उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेला कचरा प्रकल्पाला कधी मुहूर्त सापडणार असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहे. गेल्या दिड वर्षांपूर्वी ९० टक्के पूर्ण झालेल्या कचरा प्रकल्पाचे काम नुकतेच पूर्ण झाले.

गोव्यात यलो अलर्ट!

आयएमडीकडून गोव्यात १६, १९, २० आणि २१ जुलै रोजी गोव्यात यलो अलर्ट जारी. मुसळधार पावसाचा अंदाज.

पणजीतील कसिनो जेटीखाली वाहून आली मृत म्हैस

पणजीतील कसिनो जेटीखाली वाहून आलेली एक मृत म्हैस आढळली. कसिनो कर्मचाऱ्यांच्या आणि अग्निशामन दलाच्या सहकार्याने मृत म्हशीला पाण्यातून बाहेर काढण्यात आले

रजिस्ट्रार ऑफिसमध्ये सर्व्हरच्या समस्येमुळे गोंधळ

सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये सर्व्हरच्या समस्येमुळे मालमत्ता नोंदणी प्रक्रिया मंदावली आहे. लोकांना त्यांचे काम करण्यासाठी तासन्तास वाट पहावी लागत आहे. यामुळे खूप गोंधळ आणि गैरसोय झाली आहे. वृत्तानुसार, गेल्या आठवड्यापासून गोव्यात लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.

बोणये - सावईवेरे येथे गव्याचा हल्ला

बोणये - सावईवेरे येथे भाज्याच्या मळ्यात गेलेल्या धर्मा गिरोडकर व दिनेश गिरोडकर यांच्यावर गव्याचा हल्ला. दिनेश गिरोडकर हा किरकोळ जखमी झाला असून, धर्मा याच्यावर गोमेकोत उपचार सुरू. सोमवारी संध्याकाळीची घटना

केबल चोरताना तिघाजणांना रंगेहात पकडलं

माटोजे शिगाव येथील वीज खात्याचा बंच केबल चोरताना वाहनासहीत तिघाजणांना ग्रामस्थ व वीज खात्याच्या कर्मचाऱ्यानी रंगेहात पकडून कुळे पोलिसांच्या स्वाधीन केले.

गांजासह 26 वर्षीय युवकाला अटक

शिरगाव येथे रेल्वे ट्रॅकजवळ डिचोली पोलिसांची कारवाई. प्रजल गावकर या स्थानिक युवकाला 208 ग्रॅम गांजासह घेतले ताब्यात. अमली पदार्थ विरोधी कायद्याखाली संशयित युवकाला अटक. स्कुटर आणि मोबाईल जप्त

केटीसी बस स्टँडजवळ एका मोठ्या अजगराची सुरक्षितपणे सुटका

स्थानिकांनी दाखल दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी पणजी केटीसी बस स्टँडजवळ एका मोठ्या अजगराची सुरक्षितपणे सुटका केली.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाच्या नवीन अधीक्षक म्हणून सुचेता बी. देसाई यांची नियुक्ती

गोवा सरकारने केलेल्या एका महत्त्वपूर्ण प्रशासकीय फेरबदलात सुचेता बी. देसाई यांची कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहाच्या नवीन अधीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

वाऱ्यामुळे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूकीवर परिणाम

साकोर्डा देऊळमळ येथे वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर झाड पडल्याने काही तास वाहतूकीवर परिणाम. ग्रामस्थांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

SCROLL FOR NEXT