goa breaking news marathi Dainik Gomantak
गोवा

Goa News: साखळी रवींद्र भवनमध्ये मुलांनी रंगवला "देश के रंग नृत्य के संग''; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News 14 August 2025: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घटना.राजकारण, मनोरंजन, क्रीडा, हवामानाचा अंदाज आणि इतर महत्वाच्या घडामोडी

गोमंतक ऑनलाईन टीम

साखळी रवींद्र भवनमध्ये मुलांनी रंगविला "देश के रंग नृत्य के संग

साखळी रवींद्र भवनतर्फे स्वतनत्रदिनाच्य पुर्वसंध्येला आज १४ ऑगस्ट रोजी सकाळी रवींद्र भवनात साखळी मतदारसंघातील प्राथमिक स्थरावरील विद्यार्थ्यांसाठी "देश के रंग नृत्य के संग" हा विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आत्तापर्यंत राज्यात 13 कॉलराचे रुग्ण

उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत देसाई यांनी आरोग्य आणि मत्स्यव्यवसाय विभाग, कुटबण जेटी येथे कॉलराच्या आजाराबाबत तपासणीचे आवाहन केले. बोटींवर उघड्यावर शौचास जाण्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. मत्स्यव्यवसाय विभागाने डिंगी बोट मालकांना आणि सोडून दिलेल्या बोटींना ३० दिवसांच्या आत त्यांच्या बोटी काढून टाकण्यास नोटिसा पाठवल्या आहेत अन्यथा त्यांना १ लाख दंड भरावा लागेल.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घरांवर तिरंगा उंच फडकविण्याचे आवाहन केले

या स्वातंत्र्यदिनी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रत्येक गोव्यातील नागरिकांना त्यांच्या घरांवर तिरंगा उंच फडकविण्याचे आवाहन केले आहे.

फुड प्रोसेसिंग युनिटचे आमदार डॉ देविया राणे यांचा हस्ते थाटात उद्घाटन

गोवा राज्य जैवविविधता मंडळ यांच्या जोडपावलान भिरोंडा आणि पिसुर्ले पंचायतीत फुड प्रोसेसिंग युनिटचे आमदार डॉ देविया राणे यांचा हस्ते थाटात उद्घाटन. लोकल फॉर लोकल्स ची संकल्पना. महिलाना स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रयत्न.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांनी पत्रादेवी स्मारकाच्या जागेला दिली भेट

उत्तर गोवा जिल्हाधिकारी श्री. अंकित यादव, आयएएस यांनी पत्रादेवी, पेडणे येथील शहीद स्मारकाच्या जागेला भेट दिली आणि पाहणी केली. पत्रादेवी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला.

सांगे बसस्थानकासमोरील दुकानात आढळला कामगाराचा मृतदेह

गुरुवार (दि.१४) सकाळी सांगे बसस्थानकासमोरील दुकानात एका कामगाराचा मृतदेह आढळला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सांगे पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गृहिणींच्या तोंडावर हास्य

चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गृहिणींच्या तोंडावर हास्य. मयेतील 73 लाडली लक्ष्मी आणि 12 गृहआधार योजनेंतर्गतचे प्रलंबित अर्ज मंजूर. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते मंजूरीपत्रांचे वाटप

साखळी मतदारसंघात काँग्रेसमध्ये फूट?

माजी ब्लॉक अध्यक्ष मंगलदास गावस आणि विद्यमान ब्लॉक अध्यक्ष राजेश सावळ यांनी आज संध्याकाळी एकाच वेळी पण वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र बैठका घेण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही बैठकांमध्ये एआयसीसी सचिव अंजली निंबाळकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील आणि त्या दोन वेगवेगळ्या नेत्यांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तिसवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची रॅली

शिवोलीमधील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चालू नूतनीकरणाची पाहणी

शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी इतर अधिकाऱ्यांसह शिवोलीमधील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चालू नूतनीकरणाची पाहणी केली, ज्याचे अपग्रेडेशन ६० लाख खर्चाने केले जात आहे.

पुढील १-३ तासांत उत्तर गोवा, दक्षिण गोव्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस

हवामान खात्याच्या अंदाजनुसार पुढील १-३ तासांत उत्तर गोवा, दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: अडीच वर्षीय मुलीच्या खूनप्रकरणी 'मास्टरमाईंड'ला 7 दिवसांची पोलिस कोठडी, संशयित बंगळूरुतून अटकेत; डिचोली पोलिसांची कारवाई

Shocking: क्रिकेट जगतात खळबळ! ड्रग्जच्या व्यसनामुळं दिग्गज क्रिकेटपटूची कारकीर्द उद्ध्वस्त, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमची 'एक्झिट'

Chhattisgarh Train Accident: छत्तीसगढमध्ये मोठा रेल्वे अपघात! लोकल ट्रेनची मालगाडीला जोरदार धडक,10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी; प्रवाशांची धावपळ VIDEO

Vaibhav Suryavanshi Record: 9 चौकार, 4 षटकार... 'टेस्ट'मध्ये 'टी-20' सारखा धमाका, 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं पुन्हा इतिहास रचला

Pirna Murder Case: पीर्ण खून प्रकरणी कोलवाळ पोलिसांना मोठं यश, दोन आरोपींनी केले आत्मसमर्पण; लवकरच होणार मोठा उलगडा?

SCROLL FOR NEXT