जर इंडिया अलायन्सचे उमेदवार निवडून आले तर ते भाजपमध्ये सामील होतील. दिल्लीतील राजकीय पक्ष स्वार्थासाठी आहेत. गोवावासीयांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. मी इतर राजकीय पक्षांतील खऱ्या आणि प्रामाणिक नेत्यांना आरजीपीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो; गोवा वाचवण्यासाठी : मनोज परण, आरजीपी अध्यक्ष
आसगावहून हणजूणकडे निघालेल्या कारचे नियंत्रण सुटले आणि आसगाव येथे उभ्या असलेल्या कारवर आदळल्याने कार उलटली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटक ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय कार चालवत होता.
कर्नाटकची प्रवासी बसगाडी डिचोलीत अडवली. बसस्थानक सोडून बगलमार्गावरून परस्पर बेळगावी जात होती बस. कन्नड महासंघाचे अध्यक्ष हनुमंत रेड्डी यांनी एकट्यानेच अडवली बसगाडी.
दिल्लीत डबल इंजिन सरकार येणे काळाची गरज होती. दिल्लीवासीयांनी केजरीवाल यांना डावलले असून आता येणाऱ्या २०४७ पर्यंत दिल्लीत तसेच गोव्यातही डबल इंजिन सरकारच राहणार. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला विश्वास.
सत्तरी तालुक्यातील घरे ही सरकारी आणी आल्वारा जमिनीत आहेत. या लोकांना मुंडकार कायद्याचा लाभ मिळत नाही. त्यांच्यासाठी वेगळा कायदा आवश्यक. सत्तरीतील मोकासो जमिनीतील घरांना मुंडकार कायदा लागू. मात्र मोकाशातील मोजक्याच लोकांकडून मुंडकार कायद्याखाली अर्ज करण्यात आले आहेत - एड. गणपत गावकर,सामाजीक कार्यकर्ते
गेली अनेक वर्षे कंत्राटी व आता मजूर पुरवठा सोसायटी अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. कामगारांना या अर्थसंकल्पानंतर सातवा वित्त आयोग लागू करण्याची तरतूद करणार, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.
हणजूण-वागातोर जैवविविधता समूहाने गोवा राज्य सरकारकडे व्हागतोर समुद्र किनाऱ्याला कासवांचे संवर्धन केंद्र घोषित करण्याची विनंती केली आहे.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्लीत नक्कीच भाजप सरकार निवडून येणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला विश्वास.
रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला स्थानिक नगरसेवकासह स्थानिकांचा विरोध आहे. ते थांबवले नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा त्यांचा विचार.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या कलात भाजप पुढे. भाजप ४२ तर आप २२ जागांवर पुढे. स्वता केजरीवाल, सिसोदीया, आतिशी तिघेही पिछाडीवर.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.