Goa: गोवा मराठी अकादमी पुरस्कृत आणि सत्तरी तालुका प्रभाग आयोजित मराठी साहित्य आणि सांस्कृतिक संमेलन रविवार, 18 रोजी रावण-केरी, सत्तरी येथील श्री सातेरी केळबाई देवस्थानात आयोजिण्यात आले आहे. सकाळी 7.30 वा. ग्रंथ दिंडी श्री चव्हाटा मंदिर येथून निघणार आहे. सकाळी 9 ते 11 वा.पर्यंत उद्घाटन सोहळा होईल.
यावेळी अध्यक्ष म्हणून माजी मुख्याध्यापक रामचंद्र गर्दे, उद्घाटक म्हणून नाट्य दिग्दर्शक संतोष शेटकर, प्रमुख वक्ते डॉ. अशोक आमशेकर, स्वागताध्यक्ष तालुका समिती अध्यक्ष नरहरी हळदणकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, समन्वयक आनंद मयेकर, सदस्य चंद्रकांत गावस, सचिव रामकृष्ण गावस, देवस्थान समिती अध्यक्ष आपा गावस, सचिव लीना गावस, पुजारी लाडको गावस आदींची उपस्थिती लाभणार आहे.
सकाळी 11 ते दुपारी 12 वा.पर्यंत नारी शक्ती गौरव सोहळा होईल. नंतर दुपारी १ वा.पर्यंत ‘रामायणाचे महत्त्व व माहात्म्य’ यावर परिसंवाद सत्र होईल. दुपारी 2 ते 2.30 वा.पर्यंत सवेश सादरीकरण होईल. नंतर कविसंमेलनात कवी सहभाग घेणार आहेत. या सर्व कार्यक्रमांत लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गोवा मराठी अकादमी आणि सत्तरी तालुका प्रभागातर्फे करण्यात आले आहे.
लोकसंस्कृतीचे सादरीकरण
सायंकाळी 4 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमात- घुमट गाज- श्रीराम भजन जय गणराय महिला घुमट आरती मंडळ केरी, कळशी नृत्य- सातेरी केळबाय महिला मंडळ रावण, मोरुलो- प्रगती सेल्फ हेल्प ग्रुप रावण, गवळण- विठ्ठल गावस, भरतनाट्यम्- हिरा गावकर, करवली- सातेरी रवळनाथ महिला पथक हिवरे, वाद्य जुगलबंदी- कलाश्री व मराठी सांस्कृतिक केंद्र ठाणे, दवली मांड- मोरजकर लोकगीते कला केंद्र पेळावदे-केरी, अभंग- विनायक गावस, भैरवी- तुकाराम म्हाळशेकर सादर करणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.