Goa Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: क्षत्रिय मराठा समितीत कोटीचा घोटाळा! 'त्या' सात सभासदांकडून पै-पै वसूल करणार, कार्यकारिणीचा इशारा

‘गोवा क्षत्रिय मराठा’च्या नव्या कार्यकारिणी समितीची रविवारी निवडणूक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Fraud Case गोवा क्षत्रिय मराठा समाजाच्या समितीतील सात सभासदांनी गैरफायदा घेतला. समाजाच्या सभागृहाचे विविध कार्यक्रमांना येणारे भाडे तसेच इतर काही रक्कम मिळून सुमारे एक कोटीचा घोटाळा केला असून त्यांनी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप समाजाचे नेते प्रदीप शेट यांनी केला. ते पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी विजयकुमार शेट, चंद्रकांत चोडणकर, पद्मनाभ आमोणकर, विजयकुमार केळुस्कर, मंगेश चोडणकर आदी नेते उपस्थित होते. दरम्यान प्रदीप शेट म्हणाले, ज्यावेळी आम्हाला समजले की सभागृहाचे भाडे घेताना ५ हजारचा चेक घ्यायचे व इतर रोख घेतली जायची.

हे समजताच समितीतील ११ सदस्यांनी विरोध केला. त्यावेळी या ७ जणांना वगळून इतर ११ सभासदांनी कार्यालयाचा ताबा घेतला असून २७ रोजी नव्या समितीची निवडणूक घेतली जाणार आहे,असे शेट यांनी सांगितले.

बहुमताने सभासद निवडावेत !

गोवा क्षत्रिय मराठा समाजाची २७ रोजी निवडणूक घेऊन नवी समिती स्थापन करायची आहे त्यासाठी सर्व समाज बांधवांनी योग्य व्यक्तीला पाठिंबा देऊन त्यांना बहुमताने निवडून द्यावे.

आमच्या पॅनलमध्ये अनुभवी तसेच सुशिक्षित, युवा तथा अनुभवी जाणकार आहेत, त्यांना समाजाच्या उत्कर्षासाठी सर्वांनी निवडून द्यावे, असे आवाहन चंद्रकांत चोडणकर यांनी केले.

पै-पै वसूल करू !

मागील समितीत एक मी देखील सभासद होतो परंतु या समितीची कधी बैठक झाली नाही. त्यामुळे आम्हाला त्यांच्या या कुरापतींचा पत्ता लागला नाही. केवळ संगीत खुर्ची खेळण्यासारखा प्रकार या सभासदांनी केला परंतु आम्ही त्यांच्याकडून समाजाची पै-पै वसूल करू, असे पांडुरंग सावंत यांनी सांगितले.

कथित निवडणुकीचा निर्णय निषेधार्ह:- पोरोब

गोवा क्षत्रिय मराठा समाजने राज्यभरातील समाजाच्या शाखांना आर्थिक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे,असे सांगून समाजाच्या 27 रोजी घेण्यात येणाऱ्या कथित निवडणुकीबाबत माजी अध्यक्षांचा निषेधही गोवा क्षत्रिय मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष अजित पोरोब यांनी केला.

गुरुवारी, मिनेझिस ब्रागांझा सभागृह पणजी गोवा येथे गोवा क्षत्रिय मराठा समाज, पर्वरी संस्थेने गणेश चतुर्थी निमित्त आरती संग्रहाचे लोकार्पण केले.त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पोरोब यांनी सांगितले,की समाज संस्थेकडे असलेला निधी ते गावांगावातील तरुणवर्ग असलेल्या समाज शाखांना देतील. प्रत्येक शाखेला 50 हजार ते 1 लाख रुपयांच्या रकमेंचे अनुदान देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. या निधीचा समाजातील मुलांना, शिक्षण आणि इतर कार्यक्रम करण्यासाठी उपयोग होईल.

पोरोब म्हणाले की, काही समाजातील घटक हे बेकायदेशीररित्या समाजाच्या निवडणुका घेऊन सत्ता आणि ताकद आपल्या मुठीत रहावी, असा प्रयत्न करत आहेत. या विषयावर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून सध्या  हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT