Goa Traffic Police Action  Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police: म्हापसा वाहतूक पोलिसांकडून ६५ लाखांचा दंड वसूल

Mapusa Traffic: जानेवारी ते मे दरम्यान सुमारे ११५०० जणांवर कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा वाहतूक पोलिस विभागाने गेल्या पाच महिन्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत सुमारे सुमारे ६४ लाख ८५ हजार रुपये वसूल केले. जानेवारी ते मे दरम्यान ही कारवाई झाली, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक मार्लीन डिसोझा यांनी दिली.

डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार परवाना नसताना वाहन चालवल्याप्रकरणी १२ जण, दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी ११७ जण, अति वेगाने वाहन चालवणे ४१४ जण, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे १२१जण, सीटबेल्ट न लावणे ११४ जण,

हेल्मेट न घालता वाहन चालवणे १०८६ जण, गाड्यांच्या काचा काळ्या करणे २५९ जण, नंबर प्लेट नसणे ६०९ जण व इतर सुमारे ११५०० वाहनचालकांना वेगवेगळ्या प्रकरणी दंड वसूल करण्यात आला आहे.

डिसोझा यांनी पुढे सांगितले की, आपल्या विभागात पुरेसे मनुष्यबळ आहे. एका निरीक्षकासह ३ उपनिरीक्षक, ११ हवालदार, २० कॉन्स्टेबल तसेच २३ होमगार्ड आहेत.

जीप, क्रेनची कमतरता

दरम्यान, म्हापसा वाहतूक पोलिस विभागात वाहनांची कमतरता असून सध्या एक कार व एक टेम्पो आहे. सध्या एका जीपची अत्यंत गरज आहे. तसेच मोठी वाहने उचलून आण्यासाठी क्रेनची आवश्‍यकता आहे. सध्या क्रेन भाड्याची आणावी लागते. तसेच ८ दुचाकींची गरज आहे. जीप व क्रेन नसल्याने धावपळ करावी लागते, असे डिसोझा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT