Mapusa | Nilesh Cabral | Joshua D'souza Dainik Gomantak
गोवा

Mapusa: पेडे 'जंक्शन क्रॉसिंग' रस्ता होणार बंद- नीलेश काब्राल

Mapusa: पेडे जंक्शन व येथील सर्व्हिस रस्त्याची जोशुआ डिसोझा यांनी मंत्री नीलेश काब्राल यांच्यासोबत पाहणी केली.

दैनिक गोमन्तक

Mapusa: सध्या पेडे जंक्शन हे अपघातप्रवण क्षेत्र बनले असून भविष्याचा विचार करून हे जंक्शन पादचारी तसेच वाहतूकधारकांना ओलांडण्यासाठी (क्रॉसिंग) कामयचे बंद केले जाईल, अशी माहिती मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

गुरुवारी आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासोबत या जंक्शनची पाहणी केली. यावेळी नगरसेवक तारक आरोलकर, नगरसेवक विकास आरोलकर व इतर पदाधिकारी हे उपस्थित होते. या पाहणीनंतर मंत्री हे माध्यमांकडे बोलत होते.

पेडे जंक्शनवरील वाढते अपघात लक्षात घेता, हे जंक्शन क्रॉसिंगला बंद करणे उचित ठरणार आहे. जंक्शन बंद झाल्यास येथील स्थानिकांना थोडा त्रास होईल, त्यामुळे या रहिवाशांची उड्डाण पूलाची (ओव्हरपास) मागणी आहे.

जर दोन्ही बाजूने जागा उपलब्ध व एनओसी भेटल्यास आणि हा ओव्हरपास व्यवहार्य असल्यास आम्ही केंद्राकडून परवानगी आणू आणि गरजेनुसार ओव्हरपास बांधून देण्याची प्रशासनाची तयारी असल्याची ग्वाही नीलेश काब्राल यांनी दिली.

पर्यायी व्यवस्था करणार

आमदार जोशुआ डिसोझा म्हणाले, हे पेडे जंक्शन क्रॉसिंगला सध्या धोकादायक बनल्याने ते कायमचे बंद करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार महामार्गच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण केले जात आहे. त्यानंतर हे जंक्शन क्रॉसिंगला बंद होणार आहे. स्थानिकांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून ओव्हरपासचा प्रस्ताव आहे. यावर विचारविनिमय करून त्याची अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

SCROLL FOR NEXT