Mapusa Municipality: आचार संहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाकडून परवानगी घेतल्यानंतर म्हापसा नगरपालिकेने बुधवारी (ता.२७) अखेर विशेष बैठकीत आपल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचा ९२ लाख ६३ हजार रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पास मंजुरी दिली.
सविस्तर माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सत्रात बोलावलेल्या बैठकीत अंदाजपत्रकावर दुपारपर्यंत चर्चा पूर्ण न झाल्याने तहकूब केलेली ही बैठक सायंकाळी ४.३० वाजता पुन्हा बोलावली. यावेळी सुचवलेल्या नव्या दुरुस्ती करण्यात आल्या.
नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. नूतन बिचोलकर यांनी आपला पहिलाच अंदाजपत्रक पालिकेच्या विशेष बैठकीतून मांडला.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने निर्णय घेणे शक्य झाले नसले तरी बैठकीतून अनेक मुद्यांवर विस्तारीतपणे चर्चा झाली.
निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती असूनही अंदाजपत्रक उशिराने मांडण्यामागचे कारण नगरसेवक प्रकाश भिवशेट तसेच शुभांगी वायंगणकर यांनी विचारले. तसेच दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी भिवशेट यांनी केली.
नगराध्यक्ष म्हणून आपण ताबा घेतल्यानंतर उपनगराध्यक्षांची निवड झाली. १६ मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्याने अंदाजपत्रकासाठी १८ मार्चला बोलावलेली बैठक रद्द करावी लागली. त्यानंतर बैठकीसाठी आयोगाकडून परवानगी घेणे अत्यावश्यक होते असेही त्या म्हणाल्या.
३२ कोटींचा महसूल!
बिचोलकर म्हणाल्या. तसेच भविष्यात काळजी घेऊन योग्यवेळी अंदाजपत्रक सादर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या अंदाजपत्रकात ३२ कोटी १७ लाख रुपयांचा महसूल दाखवला असून, ३३ कोटी २५ लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे.
कचरा कराच्या रुपात ३ कोटी ५० लाख रुपये, व्यापारी तसेच व्यावसायिक कराच्या रुपात १ कोटी १० लाख रुपये, घरपट्टीवर १२ कोटी ५० लाख रुपये, औद्योगिक वसाहतीतील करावर ८० लाख रुपये दर्शवण्यात आले आहेत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.