Mapusa Theft Case Dainik Gomantak
गोवा

हॉटेल्स फोडली, काऊंटर जाळले, फ्रिजमधील बांगडा खाल्ला अन् तिथेच झोपला; मात्र सकाळ झाली आणि...वाचा अजब चोरीची गजब कहाणी

Mapusa Theft Case: चोरट्याची रात्रीची धमाल, सकाळी पोलिसांची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Theft Case: गोव्यात मंगळवारी पहाटे एका अजब चोरीची घटना उघडकीस आली. चोरट्याने चोरी केली अन् तो चक्क त्याच हॉटेलमध्ये झोपी गेला. पहाटे कामगारांनी जेव्हा हॉटेल उघडले तेव्हा हा झोपलेला चोरटा सापडला.

विशेष म्हणजे या महाशयांनी एका हॉटेलच्या फ्रिजमधील बांगडा काढून तळून खाल्ल्याचेही उघडकीस आले. या इंटरेस्टिंग चोरीची घटना म्हापशातील ‘शांतादुर्गा' हॉटेलमध्ये घडलीय.

त्याच झालं असा कि, चंदन हरिहर दास (18, मूळ बिहार) हा चोरटा सोमवारी रात्री म्हापशातील ‘शांतादुर्गा' हॉटेलच्या बाहेरील पाण्याच्या टाकीवरून रोहिणी ब्यूटी पार्लरमध्ये घुसला. तिथे त्याला काहीच सापडले नाही. त्यामुळे रागाच्या भरात त्याने आतील सामान जाळले. पार्लरचे नुकसान केल्यानंतर तो पोटमाळ्यावरून शांतादुर्गा हॉटेलमध्ये उतरला.

हॉटेलच्या काऊंटरमध्ये रोकड नसल्याने तेही त्याने पेटवले. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि तो हॉटेलमध्येच झोपला.

सकाळी कामगारांनी हॉटेल उघडताच त्यांना चंदन झोपलेला आढळला. कामगारांनी त्याला पकडले व चोप दिला. नंतर मालक स्वप्नील पेडणेकर यांना बोलावून पोलिसांच्या स्वाधीन केले.

या आधी त्याने म्हापसा बाजारपेठेतील हॉटेल समाधान, सन्मान हॉटेल व इतर दुकाने फोडल्याचीही माहिती मिळालीय. त्यात चोरट्याच्या हाती किरकोळ रोकड लागली होती.

संतोष बेळेकर यांच्या हॉटेल 'समाधान'मधील फ्रीजमध्ये ठेवलेला बांगडा त्याने काढला व तिथेच तळून खाल्ला. मासा खाल्ल्यानंतर त्याने तिथेच उलटी केल्याचे आढळून आले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत, सचिव सिद्धेश राऊत, खजिनदार जितेंद्र फळारी व पांडुरंग सावंत यांनी पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी व निरीक्षक सीताकांत नायक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT