Dharma Chodankar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Latest News: ‘बार्देश बाजार’चे चेअरमन धर्मा चोडणकर पायउतार

Goa News: चोडणकर हे इतर संचालकांना विश्वासात घेत नाहीत. हुकूमशाही पद्धतीने वागतात

दैनिक गोमन्तक

Goa Latest News: म्हापसा येथील बार्देश बाजार ग्राहक सहकारी सोसायटीचे चेअरमन धर्मा चोडणकर यांच्या विरुद्ध दाखल झालेला अविश्वासाचा ठराव 9 विरुद्ध 4 मतांनी समंत झाला. त्यामुळे माजी आमदार धर्मा चोडणकर यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.

चोडणकर हे इतर संचालकांना विश्वासात घेत नाहीत. हुकूमशाही पद्धतीने वागतात, असे काही आरोप या निवेदनात करण्यात आले होते. 8 रोजी सदर अविश्वास ठरावाचे निवेदन उपनिबंधक हरिष नाईक यांना सादर करण्यात आले होते. त्यांनी 28 नोव्हेंबर रोजी खास बैठकीचे आयोजन करून या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्याचा आदेश दिला.

त्यानुसार आज 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. निर्वाचन अधिकारी रामेश्वर दाभोळकर व राजेश गांवकर यांच्या अधीपत्याखाली झालेल्या बैठकीस 14 पैकी 13 संचालक उपस्थित होते. त्यातील 9 जणांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने तर 4 संचालकांनी विरोधात मतदान केले. एक संचालक या बैठकीस अनुपस्थित होता.

ठरावाच्या बाजूने खुद्द उपाध्यक्ष चंद्रकांत शेटगावकर, रघुवीर देसाई, शशिकांत कांदोळकर, प्रमोद कर्पे, बापू तुयेकर, अँड. पूनम नाईक आजगावकर, नारायण राटवड, निखिल खलप, व निर्मला खलप यांनी मतदान केले. तर विरोधात धर्मा चोडणकर, महादेव नाटेकर, एकनाथ नागवेकर, व गोकुळदास शिरोडकर यांनी मतदान केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT