Mapusa Fire Case Dainik Gomantak
गोवा

Mapusa Fire Case: करासवाडा येथे घराला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे आग भडकल्याची स्थानिकांची माहिती

म्हापसा - पिळर्ण अग्निशामक दलाने महत्वाची कामगिरी बजावत या आगीवर नियंत्रण मिळवले.

Ganeshprasad Gogate

Mapusa Fire Case म्हापसा करासवाडा येथील रहिवासी रेहान बेपारी यांच्या मालकीच्या घर क्रमांक 57 मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.

आगीची तीव्रता मोठी होती मात्र म्हापसा अग्निशामक दलाने महत्वाची कामगिरी बजावत या आगीवर नियंत्रण मिळवले. या संबंधी मिळालेली प्राथमिक माहिती पुढीलप्रमाणे-

म्हापसा करासवाडा येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये मलिक रेहान बेपारी यांच्या मालकीच्या (घर क्रमांक 57) घरामध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. आगीचे वृत्त समजताच स्थानिकांनी आग विझविण्याचे प्रयत्न करत म्हापसा अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली.

म्हापसा अग्निशामक दलाचे जवान वेळीच घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची तीव्रता ओळखून, त्यांनी पिळर्ण येथील अग्निशमन दलाला पाचारण केले.

त्यानंतर या दोन्ही अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी एकत्र येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या आगीत घराचे छत जळून खाक झाले असून अंदाजे रु. 2 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT