Goa News | Handicap Dainik Gomantak
गोवा

Goa News: अपंगत्वावर मात करत गणेश नाईकचा प्रेरणादायी जीवनप्रवास

Goa News: म्हापशातील गणेश नाईकची कथा धडधाकटांसाठीही प्रेरणादायी ठरावी, अशीच आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: दोन्ही पाय अधू असतानाही तीनचाकी सायकलवरून लॉटरीची तिकीटे विकून कुटुंबाचा चरितार्थ चालविणाऱ्या म्हापशातील गणेश नाईकची कथा धडधाकटांसाठीही प्रेरणादायी ठरावी, अशीच आहे. नोकरी नाही, काय करू, असे म्हणणाऱ्या तरुणांनी त्याच्याकडून प्रेरणा घेतल्यास त्यांना निश्‍चित मार्ग सापडेल.

सातव्या महिन्यात जन्म झाल्याने जन्मापासूनच गणेश अशक्त होता. त्याचे दोन्ही पाय अधू असल्यामुळे बालपण हलाखीचे गेले. वयाच्या पाचव्या वर्षी आई सीताबाई नाईक यांच्या कडेवर बसून त्याने शाळेत जाण्यास सुरुवात केली. इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतले. चुलते बाबा नाईक यांनी त्याला तीनचाकी सायकल घेऊन दिली. त्याची आई त्याला शाळेत पोचवण्यासाठी जायची. अशाप्रकारे त्याने आठवीपर्यंत शिक्षण घेतले.

काही वर्षांनी वडिलांचा मृत्यू झाला. उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. पाठीवर दोन लहान भावंडे असल्यामुळे घर चालवायची जबाबदारी गणेशवर येऊन पडली. तीनचाकी सायकलवरून त्याने गावात फिरून उदबत्त्या विकायला सुरुवात केली. टॅक्सी स्टॅण्डवरील श्री साई मंदिराकडे उदबत्त्या विकल्या; पण यातून उदरनिर्वाह करणे कठीण होऊ लागले.

ही बाब त्याने ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ नाईक यांच्याकडे मांडली. त्यांनी त्यांचे मित्र लॉटरी एजंट विठू पोवळेकर आणि जयप्रकाश पोवळेकर यांना गणेशला मदत करायला सांगितले. त्यांनी गणेशला अडीच हजार रुपयांची लॉटरीची तिकिटे विकायला दिली.

अनेकांना मिळाली बक्षिसे

लॉटरी तिकीट व्यवसायाचा प्रारंभ ज्येष्ठ पत्रकार महाबळेश्‍वर ऊर्फ काका नाईक यांनी केला. त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनीही मदत केली. म्हापसा रोटरी क्लबने नवीन तीनचाकी सायकल दिली. त्यावरून गणेश शहरात लॉटरीची तिकिटे विकू लागला. त्याच्या हातून विकल्या गेलेल्या तिकिटांना अनेक लहान-मोठी बक्षिसे मिळाली. एका व्यक्तीला प्रोव्हेदोरियाचे एक लाखाचे बक्षीस मिळाल्याचे गणेश अभिमानाने सांगतो.

सरकारकडून मदतीची गरज

गणेशाला वाचनाच्या छंद आहे. कॅरमसारखे बैठे खेळ खेळायला आवडतात. त्याने आपल्या भावंडांना पदवीपर्यंतचे शिक्षण दिले. अजूनही तो कुटुंबाचे पालनपोषण लॉटरी व्यवसायावरच करतो. सरकार दरबारी त्याने अपंगांसाठीच्या योजनेंतर्गत सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्याच्या प्रयत्नांना अजून यश आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अंदमानमध्ये भारतीय तटरक्षक दलाकडून तब्बल 5 टन अमलीपदार्थ जप्त

Sivakarthikeyan At IFFI: 'पोलिस व्हायचे होते पण.. '; Amaran Star ची Inspiring Journey, सभागृहात टाळ्याशिट्ट्यांची बरसात

Vaibhav Mangle At IFFI: वैभव मांगलेनी गोव्याचे केले कौतुक; म्हणाले की 'सुंदर वातावरणात....'

IFFI Goa 2024: अम्मास प्राईड ठरला चित्रपट महोत्सवातील एकमेव LGBTQ सिनेमा; "सामाजिक बदल घडवायचे आहेत" नवख्या दिग्दर्शकाचे प्रयत्न

Cortalim: यापुढे 'मेगा प्रकल्पां'ना परवानगी नाही! कुठ्ठाळी ग्रामसभेचा एकमुखी ठराव

SCROLL FOR NEXT