Cases of Dengue| Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Dengue Case: धक्कादायक! म्हापशात डेंग्यूचा फैलाव; आतापर्यंत 'एवढ्या' रुग्णांची नोंद

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Dengue Case वेळोवेळी जागरुकता शिबिरांचे आयोजन तसेच सेप्टिक टँकसाठी जाळ्यांचे वितरण करुनही म्हापसा कार्यक्षेत्रातील कीटकजन्य आजारांचा फैलावा रोखण्याच्या मुद्द्यावरून म्हापस नागरी आरोग्य अधिकाऱ्यांना जनतेकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही आहे. यंदा जानेवारीपासून ते आतापर्यंत डेंग्यूचे 20 रुग्ण आढळले, ज्यात जुलैमध्ये सात सक्रिय प्रकरणांचा समावेश होता.

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात म्हापसा नागरी आरोग्य केंद्राअंतर्गत डेंग्यूचे सात रुग्ण आढळले. कुचेली, करासवाडा, शेट्येवाडा, अन्साभाट, खोर्ली, सातिंगणवाडी व इतर भागांत ही प्रकरणे नोंदवली गेली.

जूनमध्ये आयक, डांगी कॉलनीमध्ये काही रुग्ण आढळले. आरोग्य अधिकारी डॉ. शॅरल डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली म्हापसा नागरी आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक नियमितपणे घरोघरी विविध भागांत जागृती व स्वच्छता उपक्रम राबवताहेत.

म्हापसा येथे काही विखुरलेले रुग्ण आढळले आहेत. जुलैमध्ये आमच्या क्षेत्रात सात डेंग्यूच्या रुग्णांची वेगवगळ्या भागांत नोंद झाली गेली. आमची टीम नियमितपणे डासांचा स्त्रोत कमी करण्याच्या मोहिमा, फॉगिंग , जागृती उपक्रम राबवत आहे. जेणेकरुन, आणखी रुग्ण वाढू नयेत.

-डॉ. शॅरल डिसोझा, आरोग्य अधिकारी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT