BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Metro train between BKC to Aarey JVLR section: मुंबई मेट्रो लाईन - ३ च्या बीकेसी ते आरे जेव्हिएलआर मार्गावरी मेट्रोचे मोदींनी उद्धाटन केले.
BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video
PM Modi Travel By Metro In Mumbai PM Modi X Handle
Published on
Updated on

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शनिवारी) बीकेसी ते आरे जेव्हिएलआर दरम्यान मेट्रो ट्रेन लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदींनी मेट्रोतून प्रवास केला याचा व्हिडिओ एएनआय या वृत्त संस्थेने प्रसिद्ध केला आहे. एएनआयच्या या व्हिडिओत पंतप्रधान मोदी विद्यार्थी आणि महिलांशी संवाद साधताना दिसत आहेत. मुंबई मेट्रो लाईन - ३ च्या बीकेसी ते आरे जेव्हिएलआर मार्गावरी मेट्रोचे मोदींनी उद्धाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोचे लोकार्पण पार पडल्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी स्वत: या नव्या मार्गावर मेट्रोतून प्रवास केला. यावेळी मेट्रोतील शाळकरी विद्यार्थी, महिला, कर्मचारी यांच्यासह इतर नागरिकांशी संवाद साधला. मोदींच्या या मेट्रो प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या या मेट्रो प्रवसाचे आणि नागरिकांशी संवादाचे फोटो त्यांच्या एक्स सोशल मिडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. 'विद्यार्थी, तरुण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी आणि मेट्रोची उभारणी करणाऱ्या कामगारांशी संवाद साधून आनंद झाला,' असे मोदींनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीकेसी ते आरे जेव्हिएलआर लोकार्पण पार पडले या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पावर यासह इतर राजकीय नेते उपस्थित होते.

'मुंबई आणि आसपासच्या शहरांच्या वाहतूक सुविधांबाबत आमच्या सरकारच्या काळात अभूतपूर्व काम झाले आहे, ज्यामुळे इथल्या लोकांचे जीवन अतिशय सुलभ झाले', असे मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले.

'मुंबई मेट्रो ही काँग्रेस आणि महाआघाडीने महाराष्ट्राच्या प्रगतीत कसा अडथळा आणला याची साक्षीदार आहे. विकासाच्या या शत्रूंना राज्याच्या सत्तेपासून शेकडो मैल दूर ठेवायचे आहे. महाराष्ट्रातील आमच्या माता - भगिनींना काँग्रेस आणि महाआघाडीच्या लोकांपासून यासाठी खूप सावध राहायचे आहे', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी केलेल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना म्हणाले.

'काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची एकच मोहीम आहे - समाज आणि जनतेत फूट पाडून सत्ता काबीज करणे. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं. महाराष्ट्र देखील याचा साक्षीदार राहिला आहे की, तुष्टीकरणासाठी काँग्रेस कुठल्याही थरापर्यंत उतरू शकते', असेही मोदी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com