Subhash Faldesai: ‘आयआयटी’साठी 3 महिन्यांत जागा निश्चित करणार; सांगेसह काणकोण पर्यायही उपलब्ध

एडिटर्स टेक: सुभाष फळदेसाईंशी संवाद
Subhash Faldesai
Subhash Faldesai Dainik Gomantak
Published on
Updated on

Subhash Faldesai सांगे येथील आयआयटी प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. जर ही जागा नाकारली गेली तर काणकोणमध्ये आमच्याकडे एक जागा आहे. गोव्याच्या पहिल्या बंडाच्या कुंकळ्ळी बंडावर चित्रपट बनवावा, जेणेकरून गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याची कहाणी संपूर्ण जगाला कळेल, असे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

मंगळवारी ‘एडिटर्स टेक’ या विशेष मुलाखतीत समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांच्याशी विविध विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला.

फळदेसाई यांनी उघड केले की, गेल्या वर्षी एका विशिष्ट टीमने सांगेला भेट देऊन आयआयटी प्रकल्प ज्या जागेवर येणार होता, त्या जागेची पाहणी केली होती. आणि ती जागा नाकारण्यात आली होती.

यावेळी आयआयटी प्रकल्पासाठी सांगेतील आणखी एक जागा निश्चित केली आहे. यावेळीही सांगेची जागा नाकारली गेली,तर प्रकल्पासाठी काणकोणात आणखी एक जागा निश्चित केली आहे. आम्हाला ३ महिन्यांत आयआयटी प्रकल्पासाठी जागा निश्चित करायची आहे.

Subhash Faldesai
New E-Buses in Goa: गोव्यातली वाहतूक सुविधा सर्वात वाईट! अधिवेशनात मुद्दा गाजल्यावर सरकारला आली जाग

स्वातंत्र्यावर चित्रपट बनवण्यासंबंधी बोलताना फळदेसाई यांनी नमूद केले की, पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध गोव्यातील कुंकळ्ळी विद्रोह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहिल्या बंडावर चित्रपट बनवायला हवा.

‘मी या कल्पनेबद्दल काही चित्रपट निर्मात्यांशी बोललो आहे परंतु त्यांनी मला सांगितले की, असा ऐतिहासिक चित्रपट बनवण्यासाठी बरीच गुंतवणूक करावी लागेल.

नंतर मी काही इतिहासकारांशी बोललो आणि त्यांना कुंकळ्ळी बंडाबद्दल काही महत्त्वाची माहिती संकलित करण्यास सांगितली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीच्या उद्देशाने त्यांनी ती मला द्यावी, असेही फळदेसाई म्हणाले.

पुरातत्वच्या कामकाजाबाबत फळदेसाई म्हणाले की, २ ते ३ महिन्यांत विभागातील सर्व पुरातत्व कागदपत्रे डिजीटल करण्याचा प्रयत्न आहे.

Subhash Faldesai
Rahul Gandhi Goa Visit: काँग्रेस नेते राहुल गांधी गोवा दौऱ्यावर! 'हे' आहे कारण

‘तारीपांटो’ जवळ संरक्षक भिंत उभारणार !

सांगेतील काजूकट्टा येथे रस्ता बांधण्याचे तसेच तारीपांटो पुलाजवळ एक संरक्षक भिंत बांधण्याचे आश्वासन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिले. सोमवारी संध्याकाळी तारीपांटो पुलाजवळ भीषण अपघातात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

Subhash Faldesai
Goa Court: नेरूल मधील बेकायदा बांधकामासंबंधी खंडपीठाने दिला 'हा' निर्णय; 'ते' बांधकाम चार आठवड्यात...

पुनर्बांधणीसाठी 11 अर्ज प्राप्त

पोर्तुगीजांनी जुन्या पाडलेल्या मंदिरांच्या जीर्णोद्धाराबद्दल बोलताना, फळदेसाई म्हणाले की पुरातत्व विभागाकडे जुन्या उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीशी संबंधित ११ अर्ज प्राप्त झाले आहेत.

संस्कृती, परंपरा आणि भक्तीची केंद्रे असलेल्या या मंदिरांचा आम्हाला जीर्णोद्धार आणि पुनर्बांधणी करायची आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांसमोर आपण नार्वे येथे मंदिरांचे संकुल आणि गोव्यातील हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणारे संग्रहालय बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, जो पर्यटकांना आकर्षित करेल,असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com