Mapusa Crime Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime: घरफोडी प्रकरणातील संशयिताकडून सात लाखांचे 132 ग्रॅम दागिने जप्त

सुमीर शर्मा (पंजाब) असे या अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Crime घरफोडी प्रकरणांतील संशयित आरोपीकडून म्हापसा पोलिसांनी ७ लाख ५० हजार रुपये किंमतीचे १३२ ग्रॅम सोने हस्तगत केले. सुमीर शर्मा (पंजाब) असे या अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

या संशयितास आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. यापूर्वीची पाच दिवसांची पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपुष्टात आली.

पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या माहितीनुसार, या घरफोडी प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती. ज्यात म्हापसा पोलीस निरीक्षक सीताकांत नायक, कोलवाळ पोलीस निरीक्षक विजय राणे तसेच उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर, उपनिरीक्षक बाबलो परब यांचा समावेश होता.

ज्यांनी संशयिताकडून चौकशी करुन या चोरीप्रकरणांचा छडा लावत चोरीला गेलेले सुवर्णालंकार जप्त केले आहे.

संशयिताने पहिली चोरी ही ६ जून २०२३ रोजी, तक्रारदार चंद्रकांत सिंग (रा.काणका) यांच्या घरी केली होती. तेथून संशयिताने फ्लॅटचा मुख्य दरवाजा फोडून तेथून सोने व चांदीचे सुवर्णालंकार चोरले. या दागिन्यांची किंमत ७ लाख रुपये इतकी होती.

या प्रकरणातील पोलिसांनी संशयिताकडून ४ लाख ५९ रुपयांचे कर्ण अलंकार व सोनसाखळी हस्तगत केली. या संशयितांची पोलिसांनी चौकशी केली असता संशयिताने कोलवाळ चोरीमध्ये आपला सहभाग असल्याचे कबुल केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT