Crime News  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Assault Case: म्हापसा येथे राहणाऱ्या 22 वर्षीय परप्रांतीय तरुणावर प्राणघातक हल्ला; शरीरावर धारदार चाकूने वार

Mapusa Assault Case: गोव्यात वाढत्या गुन्हेगारीचा कहर; एकामागून एक हल्ल्यांच्या घटना सुरुच, पोलीसांसमोर आव्हान

Ganeshprasad Gogate

Mapusa Assault Case: गोव्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून पोलीस प्रशासनासमोर या गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान बनले आहे.

शुक्रवारी (ता.22) दुपारी ओर्डा-कांदोळी येथील आईस फॅक्टरी परिसरात संशयित सॅम मायकर राठोड ऊर्फ शंकरप्पा याने अजित रूपसिंग राठोड, मिथुन शिवानंद पवार तसेच अशोक चव्हाण या कर्नाटकमधील तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघड होते न होते तोच शुक्रवारी रात्रौ उशिरा उत्तर गोव्यातून अशीच एका धक्कादायक घटना समोर आलीय.

घाटेश्वरनगर, म्हापसा येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या उत्तर प्रदेशमधील मोहम्मद उस्मान (22) याच्यावर सुरीच्या साहाय्याने प्राणघातक हल्ला केल्या समोर आले आहे. या घटनेतील संशयित आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार सदर घटना 19 मार्च 2024 रोजी रात्री 12.30 च्या सुमारास घडली आहे.

मोहम्मद उस्मान गफ्फार (वय 22, राहणार. घाटेश्वर नगर, खोर्ली- म्हापसा, बार्देश उत्तर गोवा) हे रात्रौच्या सुमारास फिरायला घराबाहेर पडले असता दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अमानुष प्राणघातक हल्ला केला.

हल्लेखोरांपैकी एकाने धारदार चाकूने गफ्फार याच्यावर वार केल्यानंर भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी गफ्फार घटनास्थळावरून पळून गेला.

या हल्ल्यानंतर गफ्फार याला त्यांच्या भावाने उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर प्राथमिक वैद्यकीय उपचार केल्यावर त्याला बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) हलवण्यात आले.

गफ्फार याला चाकूच्या वारामुळे मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असून त्याच्या संपूर्ण शरीरावर 65 पेक्षा जास्त टाके पडले आहेत. दरम्यान पोलीस फरार संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT