Bodgeshwar Jatra Dainik Gomantak
गोवा

Bodgeshwar Jatra: स्टॉलवाले म्हणाले, 'परवानगी दिलीय' तर पालिका म्हणतेय, 'परमिशन नाहीच'; नक्की काय प्रकार? पहा व्हिडीओ

Bodgeshwar Jatra: गेले चार दिवस पालिका याप्रकाराबाबत गप्प का होती? स्थानिक

Ganeshprasad Gogate

Bodgeshwar Jatra: बोडगेश्वर जत्रोत्सव फेरीतल्या गोबी मंचुरियन स्टॉल्सवर म्हापसा पालिकेने कारवाई केल्यावर उपस्थितांनी याबाबतच्या प्रतिक्रिया पत्रकारांकडे व्यक्त केल्या आहेत. ''गेले चार दिवस पालिका याप्रकाराबाबत गप्प का होती.

ही कारवाई करतात अन्नाचा अपमान करणं पालिकेला शोभलं का?'' अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिल्या. दरम्यान कारवाईवेळी पालिका कर्मचाऱ्यांनी शिजवलेल्या भरलेल्या क्रेट, कढई कचऱ्याच्या डब्यात ओतल्या.

तसेच अन्य साहित्यात पाणी ओतल्याचे विडिओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत बऱ्याच जणांनी नाराजी व्यक्त केलीय.

फेरीतील स्टॉल धारकांशी संवाद साधल्यावर त्यांनी अशी माहिती दिली की, 'गोबी मंचुरीयन स्टॉल लावायला कमिटीनेच परवानगी दिली, अन्यथा मागील 4 दिवसांपासून आम्ही हे बंद ठेवलं होत.

आमच्याकडे फूड लायसन्स असून या कारवाईबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. मंदिर कमिटीने गोबी मंचुरियन स्टॉल साठी पावती फाडून आम्हाला जागा दिली. व्यवसाय करायला परवानगीही दिली.

कारवाई करण्यासाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांशी बातचीत केल्यावर ते म्हणाले, आम्ही पहिल्या दिवसांपासून स्टॉल धारकांना 'गोबी मंचुरियन विकू नका' हेच सांगितलं आहे.

आम्ही जेव्हा फेरीत तपासणीसाठी फिरतो तेव्हा ते, ''आम्ही, सॅन्डविच विकतो, कणसं विकतो, भेळपुरी विकतो'', असे सांगून आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही गेल्यावर लपवून ठेवलेल्या गोबीच्या क्रेट्स बाहेर काढतात.

त्यांना दम बसावा यासाठी आम्ही काल शनिवारी त्याच्या कढई काढून नेल्या होत्या, मात्र आजही त्यांनी हा प्रकार सुरु ठेवल्याने आम्ही आज त्यांच्या शेगडी, गॅस सिलिंडर हे साहित्य जप्त केलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: ‘वुमन सेफ्टी अँड सिनेमा’ सत्रात मान्यवरांची ‘सेफ बॅटिंग’! 'पॉवर प्ले आहे पण..', भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT