Stray Dogs Dainik Gomantak
गोवा

Stray Dogs: मांगोरहिलमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न ऐरणीवर! हल्ल्यात महिला गंभीर जखमी; 2 महिलांविरोधात गुन्हा नोंद

Mangor Hills Stray Dogs: मांगोरहिल येथे एका महिलेला पाळीव कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केल्याने कुत्र्याचे नोंदणीकरण व भटक्या कुत्र्यांचे प्रश्न चर्चेत आले.

Sameer Panditrao

वास्को: मांगोरहिल येथे एका महिलेला पाळीव कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केल्याने कुत्र्याचे नोंदणीकरण व भटक्या कुत्र्यांचे प्रश्न चर्चेत आले. त्या महिलेने पोलिस तक्रार केल्याने पोलिसांनी दोन महिलांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.आता पोलिस व पालिका कोणती कारवाई करतात याकडे वास्कोवासियांचे लक्ष लागले आहे.

भटकी कुत्रे हाताळण्याचे काम पीपल्स फॉर अ‍ॅनिमल संस्थेला देण्यात आले आहे. त्यासाठी मुरगाव पालिका त्या संस्थेला निधी देते. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजिकरण करण्याची मोहीम राबविण्यासाठी सदर संस्थेला निर्देश दिले आहेत, तसेच पाळीव कुत्रे ज्यांच्याकडे आहेत, त्यांचे नावे व पत्ते आम्हाला द्या आम्ही त्यांना कुत्र्यांची नोंदणी करण्यास भाग पाडू असे त्या संस्थेच्या प्रतिनिधींना सांगण्यात आले होते.त्यानंतर गेल्या वीस दिवसांत कितीजणांची नावे पालिकेला मिळाली ते स्पष्ट होऊ शकले नाही.

येथे पाळीव कुत्र्यांचे नोंदणीकरण व्हावे यासाठी जागरूकता मोहीम हाती घेण्याची गरज आहे. बरेचजण कुत्र्यांना इंजेक्शने वगैरे देतात की नाही याची कोणतीही नोंद नाही. जर पीपल्स फॉर अ‍ॅनिमल कुत्र्यांचे लसीकरण, निर्विजिकरण करते तर भटक्या कुत्र्यांची संख्या का वाढते असा प्रश्नही विचारण्यात आला.

परंतु देशी कुत्रे कोणीही दत्तक घेण्यास पुढे येत नसल्याचे उत्तर देण्यात आले होते. येथे मुरगाव पालिकेच्या कचरा संकलन केंद्रांचे कचरापेट्या रस्त्याकडेला ठेवण्यात येतात.त्यातील अन्नपदार्थ खाण्यासाठी भटकी कुत्रे, जनावरे येत असल्याचे चित्र पुन्हा दिसू लागले आहे.

मांगोरहिल येथे दोन महिलांनी त्यांचा पाळीव कुत्रा हेतुपुरस्सर लक्ष्मी पिल्लई हिच्या अंगावर सोडला.त्यामुळे त्या कुत्र्याच्या हल्ल्यात लक्ष्मी पिल्लई गंभीर जखमी झाली.एवढ्यावर न थांबता आणखी कुत्रे पाळण्याची धमकी देण्यात आली. यावरून कुत्रे पाळणाऱ्यांना कायद्याचे भय नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. याला जबाबदार कोण याचाही विचार करण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"कोळसा वाढणार असे स्वप्न कोणाला पडलेय?", विरोधकांच्या आंदोलनानंतर CM सावंतांचा 'कमबॅक'

VIDEO: ट्रॉफी जिंकली पण बोलताना लाज घालवली! पाकिस्तानी क्रिकेटरची पुन्हा फजिती, ट्रान्सलेट करणाऱ्यानेच घातला गोंधळ

'IFFI 2025'साठी गोवा सज्ज! पहिल्यांदाच ओपन-एअरमध्ये होणार भव्य उद्घाटन; CM सावंतांची घोषणा

Konkan Railway: विनातिकीट प्रवाशांना मोठा झटका! 'कोकण रेल्वे'ने वसूल केले तब्बल 12.81 कोटी

"पूजा नाईकवर विश्वास नाही,ती कुणाचंही नाव घेऊ शकते"- मंत्री सुदिन ढवळीकर

SCROLL FOR NEXT