Goa Mango Production Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: 'फळांच्या राजा'चा यंदा 'गोडवा' अधिक; उत्पादनात वाढ, काजू पीकही गेल्या वर्षांच्या तुलनेत समाधानकारक

Goa Mango Production: राज्यात गेल्या दोन-तीन वर्षांत आंबा आणि काजू उत्पादनात मोठी घट नोंदविण्यात आली होती. मात्र, यंदा प्रतिकूल हवामान असतानाही आंबा उत्पादनात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली .

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्यात गेल्या दोन-तीन वर्षांत आंबा आणि काजू उत्पादनात मोठी घट नोंदविण्यात आली होती. मात्र, यंदा प्रतिकूल हवामान असतानाही आंबा उत्पादनात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती कृषी संचालनालयाचे उपसंचालक दत्तप्रसाद देसाई यांनी दिली.यंदा कोकण पट्ट्यात आंबा आणि काजू उत्पादकांना काही प्रमाणात तोट्याला सामोरे जावे लागत असले, तरी गोव्यात काजू उत्पादन गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत समाधानकारक झाले आहे.

पहिल्या पाड्यात पीक चांगले आले होते. मात्र, दुसऱ्या फुलोऱ्यावेळी काजू उत्पादन अपेक्षेप्रमाणे झाले नाही. आता तिसरा फुलोराही चांगला आल्याने अनेक भागांत अजूनही काजू उत्पादन सुरू आहे. गेल्या वर्षी आंबा उत्पादनात सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली होती. त्या तुलनेत यंदा उत्पादनात ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, सरासरी आंबा उत्पादनाच्या तुलनेत यंदा सुमारे २० टक्के अधिक उत्पादन झाले आहे. बाजारात मानकुराद आंबा प्रतिडझन ४०० रुपयांदराने विकला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्राहकांकडून मानकुराद मोठी मागणी आहे.

काजू उत्पादन

वर्ष लागवडीखालील क्षेत्र उत्पादन

(हेक्टरमध्ये) (टनात)

२०२४-२५ ५६९५३ २४८८२

२०२३-२४ ५७००१ २४२४०

२०२२-२३ ५६९३४ २५८००

२०२१-२२ ५६८९० २६०३२

२०२०-२१ ५६८२९ २७३६६

२०१९-२० ५६४७८ २८६३०

आंबा उत्पादन

वर्ष लागवडीखालील क्षेत्र उत्पादन

(हेक्टरमध्ये) (टनात)

२०२४-२५ ५१४९ १०४४०

२०२३-२४ ५०९० १००७९

२०२२-२३ ५०७१ १०१८८

२०२१-२२ ५०६८ १०१६०

२०२०-२१ ५०६२ १०२८२

२०१९-२० ५०३४ ११००६

“यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन झाले आहे. मानकुराद तसेच इतर जातींचे आंब्याचे पीकही चांगले आले आहे. काजूचे पीक मध्यंतरी काही प्रमाणात घटले होते; मात्र आता समाधानकारक उत्पादन मिळत आहे.”

- सुनील हरवळकर, युवा शेतकरी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT