Goa man convicted UK
इंग्लंडमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणात गोव्यातील तरुण दोषी आढळला आहे. साऊथम्पटन कोर्टाने गोव्यातील ३४ वर्षीय तरुणाला एक वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावत देशातून हकालपट्टी केली आहे. तरुण एका क्रूझवर शेफ म्हणून काम करत असताना त्यांने रात्रीच्या वेळेस अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर होता.
विन्सेंट (३४) असे या दोषी आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची इंग्लंडमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच, इंग्लंडच नव्हे तर जगातील कोणत्याच क्रूझवर तो दिसला नाही पाहिजे, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. विन्सेंट भारतात परतल्यानंतर त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे.
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोषी विन्सेट स्काय प्रिन्सेस क्रूझवर शेफ म्हणून काम करत होता. इंग्लंडला क्रूझ परत जात असताना रात्रीच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप विन्सेटवर करण्यात आला. साऊथम्पटन कोर्टात याप्रकरणी चार दिवस सुनावणी सुरु होती. सुनावणी अखेरीस विन्सेट दोषी आढळला असून, त्याला एक वर्ष तुरुंगासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पीडित मुलीने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, या प्रसंगामुळे तिच्यावर मोठा मानसिक आघात झाला आहे. या प्रसंग आयुष्यभर तिच्या लक्षात राहिल. तसेच, यामुळे तिच्या मनात सार्वजनिक ठिकाणांबाबत असुरक्षिततेची भावना निर्माण झालीय. रात्रीची झोप उडालीय आणि सतत रडू येत आहे. त्यामुळे समुपदेशनाची गरज भासत आहे, असे पीडितेने कोर्टात माहिती दिलीय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.