Pitbull Dog Attack Dainik Gomantak
गोवा

Pitbull Dog Attack: कुत्रा भुंकण्यावरून वाद, 70 वर्षीय ज्येष्ठाच्या अंगावर सोडला पिटबुल! हळदोणेतील धक्कादायक घटनेत वृद्ध गंभीर जखमी

Goa Crime News: राज्यात यापूर्वी पिटबुल कुत्र्याच्या हल्ल्यात काहीजण जखमी झाल्याची प्रकरणे डोळ्यांसमोर असतानाच हळदोणेतील एकाने ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर जाणीवपूर्वक पिटबुल कुत्रा सोडल्याने ते गंभीर जखमी झाले.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: राज्यात यापूर्वी पिटबुल कुत्र्याच्या हल्ल्यात काहीजण जखमी झाल्याची प्रकरणे डोळ्यांसमोर असतानाच हळदोणेतील एकाने ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर जाणीवपूर्वक पिटबुल कुत्रा सोडल्याने ते गंभीर जखमी झाले. या घृणास्पद घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कुत्रा भुंकण्याच्या वादातून संशयित राहुल केरकर याचा शेजारी राहणारे ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक प्रदीप शिरोडकर यांच्याशी जोरदार वाद झाला. हा वाद नंतर विकोपाला गेला. संशयित राहुलने प्रथम शिरोडकर यांना अश्लील शिवीगाळ केली आणि नंतर घरातील फरशी पुसण्याच्या मेटल मॉपने (पाईपने) त्यांना जोरदार मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता संशयिताने जाणीवपूर्वक आपला पाळीव पिटबुल कुत्रा त्यांच्या अंगावर सोडला.

यावेळी पिटबुल कुत्र्याने कडाडून चावा घेतल्याने प्रदीप शिरोडकर हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी प्रदीप यांचे भाऊ सुशांत शिरोडकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी राहुल केरकरविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३५२, ११८(२), २९१ तसेच ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्याच्या कलम २४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमेय नाईक करत आहेत.

लोखंडी रॉडने केली मारहाण

खोईरुत - हळदोणे येथे कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. कुत्रे भुंकत असल्याच्या रागातून राहुल केरकर याने ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर आधी लोखंडी रॉडने जोरदार हल्ला केला. नंतर त्यांच्या अंगावर आपला पिटबुल कुत्रा सोडून गंभीर जखमी केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी केरकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Farmers Subsidy Increase: गोव्यात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; नुकसानग्रस्तांना मिळणारे अनुदान वाढविणार, कृषिमंत्री संकल्प आमोणकर यांनी घेतला पदभार

Rohit Sharma Catch: वयाच्या 39व्या वर्षी रोहित शर्माची मैदानात 'चित्त्यासारखी' झेप! हवेत डाइव्ह मारत पकडला भन्नाट झेल, पाहा VIDEO

Smart Meter Project: स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करता येणार नाही! वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे स्पष्ट संकेत; म्हणाले, 'येणारा काळ तंत्रज्ञानाचा'

Goa Politics: सावर्डेत भाजपच्या उमेदवारीवरून राजकीय हालचालींना वेग; विद्यमान आमदार गणेश गावकरांना डावलण्याची मागणी करत सहा नेते एकवटले

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांविरोधात काँग्रेस आक्रमक, पोलिस मुख्यालयावर काढला मोर्चा; सरकारकडे ठोस उपाययोजनांची मागणी

SCROLL FOR NEXT