Goa man arrested Belagavi theft Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील व्यक्तीकडून बेळगावात चोरी, 24 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; 160 ग्रॅम दागिने ताब्यात

Goa man arrested Belagavi theft: बेळगाव शहरातील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत गोव्यातील एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून २४ लाखांचे १६० ग्रॅम सोन्याचे दागिने सोमवारी (ता. १३) जप्त केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

बेळगाव शहरातील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत गोव्यातील एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून २४ लाखांचे १६० ग्रॅम सोन्याचे दागिने सोमवारी (ता. १३) जप्त केले. या कारवाईमुळे शहरातील दोन घरफोडी प्रकरणांचा उलगडा झाला आहे.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव तंगराज सेल्वराज आचार्य (वय ४०, रा. सांगोल्डा - म्हापसा) असे आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ एप्रिल २०२५ रोजी शिवराम गणपती भट (रा. बेळगाव) यांनी आपल्या घरात चोरी झाल्याची तक्रार कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल केली होती.

या प्रकरणाचा तपास पोलिस आयुक्त भूषण बोरसे तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद एम. वणकुद्रे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन केले होते.

तपासादरम्यान पोलिसांनी तंगराज याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीत आरोपीने सुमारे वर्षभरापूर्वी गणेशपूर येथील सरस्वतीनगर परिसरात तसेच आठ महिन्यांपूर्वी मिलिटरी क्वार्टर्स परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून २४ लाखांचे १६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

काजू हंगाम ओसरला, फेणीच्या भट्ट्या थंडावल्या, बोंडूच्या कमतरतेमुळे उत्पादनात 50 टक्के मोठी घट; डिचोलीत फेणीचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

Goa Tiger Death: गोव्याच्या जंगलात सांडतेय वाघांचे रक्त! प्रशासनाची मात्र डोळेझाक; केरी, गोळावली नंतर आता साकोर्डा,वाघांच्या हत्यांची मालिका थांबेना

Morajit Traffic Jam: मोरजीत वाहतुकीचा खेळखंडोबा! रस्त्याच्या बाजूनेच वाहनांचे ‘पार्किंग’; नागरिक त्रस्त

Pakistan Donkey Meat Export: चिनी कंपनीनं धमकी देताच पाकड्यांची तरारली, शाहबाज सरकारनं गाढवाच्या मांस निर्यातीला दिली मंजुरी; काय नेमकं प्रकरण?

VIDEO: पांढरी साडी, हवाई चप्पल अन् हातात झालमुडी! भाजप कार्यालयाबाहेर ममता 'दीदीं'चा अवतार पाहून कार्यकर्ते अवाक; 'हम्बा-हम्बा'नं उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT