Closed government hotel 'Goa Darbar' Dainik Gomantak
गोवा

Goa: मालपे गोवा दरबार बनला भूत बंगला

पर्यटन खात्याचे (Tourism department) दुर्लक्ष (Goa)

निवृत्ती शिरोडकर

भाजपा सरकारने विचार करूनच पेडणे तालुक्यासाठी पंपाने पर्यटन खात्याचा (Goa Tourism) अधिकार दिला, पेडणेचे आमदार बाबू आजगावकर (MLA Babu Ajgaonkar) याना पर्यटन खाते आणि मान्द्रेच्या आमदाराला गोवा पर्यटन विकास महामंडळ चेरमेन केले, तालुक्याचा पर्यटन नजरेतून हवा तसा विकास करण्याची मुभा सरकारने या दोन्ही लोकप्रतिनिधीना दिलेली आहे. असे असतानाही मालपे येथील हॉटेल गोवा दरबार (Hotel Goa Darbar) भूत बंगला आणि सरकारी स्केप अड्डा बनवण्याची किमया पर्यटन खात्याने केल्यामुळे मिशन फॉर लोकलचे (Mission for Local) राजन कोरगावकर यांनी नाराजी व्यक्त करून या ठिकाणी अग्निशमन दलाचे कार्यालय स्थलांतरित करावे किवा रवींद्र भवन या जागी अतिरिक्त जमीन घेवून उभारण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी राजन कोरगावकर यांनी केली आहे.

Improperly rotten vehicles in the premises of Hotel 'Goa Darbar'

एका बाजूने सरकारची कार्यालये खाजगी भाड्याच्या जागेत भरत आहेत तर दुसऱ्या बाजूने सरकारी जागा भाडेपट्टीवर देण्यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करीत आहेत, हि स्थिती आहे पेडणे तालुक्याच्या मध्यावर्थी ठिकाणी असलेल्या मालप पेडणे येथील हॉटेल गोवा दरबार विषयी. त्यापेक्षा सरकारने हि जागा स्थानिक बेरोजगार युवकाना हॉटेल प्रकल्प उभारण्यासाठी द्यावी. मालपे पेडणे येथे गोवा पर्यटन महामंडळाचे हॉटेल गोवा दरबार आहे, मागच्या दहा वर्षापासून हे बंद आहे, सध्या हि जागा पर्यटन खात्याला आपली वाहने , बोटी ठेवण्यासाठी स्क्रेप अड्डा म्हणून नावारूपास आणलेली आहे, निकामी झालेली वाहने , बोटी या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत , येथे स्मशान शांतता असते, सरकार या जागेचा वाली असून नसल्यासारखा वागत आहे. मागच्यावेळी या ठिकाणी आग लागून अनेक नादुरुस्त वाहनांना, बोटीना आग लागली होती.

Improperly rotten Boats in the premises of Hotel 'Goa Darbar'

२०१७ नंतर भाजपाचे गैरमार्गाने सरकार सत्येवर आल्यानंतर या जागेतील ८०० चौरस मीटर जागा एका खाजगी नागरिकाला पेट्रोलपंप उभारण्यासाठी लीजवर दिली. त्या पेक्षा पर्यटन खात्याच्या मंत्र्याने या ठिकाणी रवींद्र भवन उभारून कलाकारांची गैरसोय दूर करावी , अशी मागणी कलाकार करीत असताना सरकारला जनतेचे पडलेले नाही, अश्या तोऱ्यात कार्यरत आहे. हि जागा मध्यावर्थी ठिकाणी असल्याने त्याचा फायदा सर्वाना होणार आहे , जवळच रेल्वे स्टेशन , राष्ट्रीय महामार्ग जात आहे , मोपा विमानतळ होवू घातले आहे , या जागेपासून 2 किलोमीटर अंतरावर पेडणे शहर , पोलीस स्टेशन , सर्व शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे हि जागा रवींद्र भवनसाठी योग्य असून पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी फेरविचार करून धारगळ येथील क्रीडा नगरीच्या जागेत रवींद्र भवन उभारण्यापेक्षा हॉटेल दरबार जागेत रवींद्र उभारावे अशी मागणी कलाकार करत आहेत.

Improperly rotten vehicles in the premises of Hotel 'Goa Darbar'

पेडणे राष्ट्रीय महामार्ग ६६ याचा विचार केल्यास मालपे , सुकेकुळण व धारगळ अश्या तीन ठिकाणी पेट्रोल पंप असून आणखी पेट्रोलपंची गरज नव्हती , त्यापेक्षा सरकारने या ठिकाणी तारांकित हॉटेल प्रकल्प उभारून पेडणे शहरालाही एक नवा साज चढवण्यासाठी मदत करावी अशी मागणी सर्व स्थरातून होत आहे. या विषयी गोवा पर्यटन विकास महामंडळ चेरमेन दयानंद सोपटे यांच्याकडे संपर्क केला असता या ठिकाणी तारांकित हॉटेल उभारण्याची योजना आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याचे ते म्हणाले. या जागेत पेट्रोलपंप उभारून सरकारने चांगल्या प्रकल्पाला बाधा आणलेली आहे. , हॉटेल प्रकल्प झाला तर बेरोजगार , टेक्शी व्यावसायिक , दुकान, लहान मोठे व्यावसायिक याना फायदा होवू शकतो , जवळपास पेट्रोलपंप असतानाचं हाकेच्या अतरावर दुसऱ्या पेट्रोलपंपाची काय गरज असा सवाल उपस्थित केला जात होता, तरीही सरकार आपल्या हट्टाला पेटले आणि त्या ठिकाणी पेट्रोल पंप उभारण्यासाठी हिरवा कंदील दिलाच.

Rajan Korgaonkar (Mission for Local) Goa

मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी प्रतिक्रिया देताना पर्यटनमंत्री हे पेडणे मतदार संघाचे असल्याने त्यांनी पर्यटन खात्याचे असलेले प्रकल्प सांभाळायला हवेत उलट नवीन प्रकल्प आणले तर त्याचे स्वागत केले जाईल, असलेले प्रकल्प मोडीत काडून त्याच जागेत पेट्रोलपंप उभारणे कितपत योग्य असा सवाल केला . हि जागा शेतीच्या कुळांची , पर्यटन खात्याने या ठिकाणी हॉटेल प्रकल्प उभारण्यासाठी संपादित केली होती , कुळांची जमीन त्या कुळाने हॉटेल प्रकल्पासाठी दिली होती , आता सरकार ती जागा हॉटेल व्यतिरिक्त पेट्रोलपंपासाठी जागा देवून जमीन मालकावर अन्याय केला . त्यापेक्षा सरकारने ती जमीन परत कुळांच्या हवाली करावी अशी मागणी राजन कोरगावकर यांनी केली.

एका बाजूने सरकारच्या इमारती कोसळण्याच्या मार्गावर आहेत त्या इमारती व जागा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारला अपयश आले आहे, तर दुसऱ्या बाजूने पेडणे शहरातील विभाग टपाल, पशु संवर्धन विभाग, हे कार्यालये खाजगी भाड्याच्या जागेत भरत आहेत त्यातून सरकारचा महसूल वाढण्यापेक्षा तो कमी होत आहे , याचाही सरकारने विचार करावा. शिवाय मामलेदार कार्यालयातील अनेक विभाग अडगळीत जागेत काम करतात. त्या ठिकाणी लक्ष देण्याची मागणी होत आहे. हॉटेल गोवा दरबार जागेत सरकारला, तारांकित हॉटेल किंवा रवींद्र भवन उभारायचे नसेल तर निदान पेडणे अग्नी शामन दलासाठी हि जागा द्यावी.

पेडणे तालुक्यात नियोजित मोपा विमानतळ होणार आहे आंतरास्त्रीय क्रिकेट मैदान होणार आहे, रवींद्र भवन उभारण्याचा प्रस्थाव आहे , या सर्व बाबींचा विचार करून पेडणे तालुक्यासाठी आग विजवण्याची यंत्रणा सक्षम करायला हवी , सध्या पेडणे शहरातील अडगळीत जागेत अग्निशमन दलाचे कार्यालय आहे अरुंद रस्ते त्यात भर पडते ती पार्किंग व्यवस्थेची , वाहने कुठल्या कुठे ठेवली जात असल्यानेच अग्नी बंब सहज शहरातून बाहेर पडत नाही, आणि दर गुरुवारी जी आठवड्याचा बाजार भरतो तो पूर्ण रस्त्यावर भरवला जातो , आणि त्या दिवशी अग्नी शमन दलाला आदल्या रात्री आपापली वाहने इतरत्र ठिकाणी ठेवावी लागत आहे, सरकारने याचे गांभीर्य ओळखून अग्नी शमन दलाला मालपे राष्ट्रीय महामार्गा शेजारील हि जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांची गैर सोय दूर होवू शकते. हॉटेल गोवा दरबार हे पर्यटन खात्याचे मागच्या सहा वर्षापासून बंद आहे , सरकारने या इमारतीकडे एकदाही गांभीर्याने पाहिलेले नाही त्यामुळे हि इमारत म्हणजे भूत बंगला व स्क्रेप अड्डा बनलेला आहे . गोव्याच्या किनारी भागातील पर्यटन खात्याच्या जल बोटी व वाहने जे स्क्रेप मध्ये जातील असे सामान या ठिकाणी ठेवलेले आहे त्यामुळे हा सरकारीच स्केप अड्डा असल्यासारखा वाटतो , सहावर्ष वापराविना हे हॉटेल ठेवून सरकारने महसूल बुडवलेला आहे , हा महसूल बुडवण्यास कोण कारणीभूत आहे त्याची चौकशी व्हायची गरज असल्याचे काही नागरिक मत व्यक्त करीत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT