Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'महात्मा गांधीजींची विचारसरणी भाजपच पुढे नेतोय'- मायकल लोबो

Goa News: राष्ट्रपिता महात्मा गांधींजींची विचारसरणी त्यांचे कार्य केवळ भाजप आणि पंतप्रधान मोदीजीच पुढे नेत असल्याचा दावा केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: राष्ट्रपिता महात्मा गांधींजींची विचारसरणी आणि स्वच्छतेसंदर्भात त्यांचे कार्य केवळ भाजप आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच पुढे नेत असल्याचा दावा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी हडफडेत केला. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महात्मा गांधी आणि राहुल गांधी यांच्यात कुठलेही रक्ताचे नाते नसल्याच्या केलेल्या विधानाचेही लोबो यांनी समर्थन केले.

हडफडे येथील स्थानिक शेतकऱ्यांना मोफत मळणी यंत्राचे वाटप केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी हडफडेचे सरपंच (Sarpanch) रोशन रेडकर, उप-सरपंच गीता परब, माजी सरपंच तसेच विद्यमान पंच सदस्य राजेश मोरजकर, टिनू डिसोझा, इतर मंडळाचे सदस्य, भाजप कळंगुट मंडळाचे अध्यक्ष यशवंत कांदोळकर, सदस्य सुदेश शिरोडकर, लक्ष्मण परब, माथाइश डिसोझा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कळंगुट (Calangute) पंचायतीचे सरपंच जोजफ सिक्वेरा यांच्याशी आपले कुठल्याच प्रकारचे मतभेद नसल्याचे सा़ंगतानाच सिक्वेरा राजकारणातील धुरंधर असल्याचे लोबो यांनी सांगितले. कालच पार पडलेल्या झेडपीच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी दाखवलेल्या निरुत्साहाचे कारण, जिल्हा पंचायत सदस्यांना विकासकामांसाठी मिळणारा अपुरा निधी तसेच विकासकामांसाठी मिळणारा अपुरा निधी असल्याचे सांगितले.

झेडपींसाठी सध्या मिळणारा निधी गटार बांधकामासाठीसुद्धा पुरत नसल्याचे लोबो यांनी यावेळी सांगितले. झेडपींच्या अधिकाराखाली गावातील चिल्ड्रन्स पार्क्स, बॅडमिंटन मैदाने, जॉगर्स पार्क आदी एकाच छताखाली आणणे गरजेचे असल्याचे लोबो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT